Join us
Daily Top 2Weekly Top 5

छतावरील टाकीतलं पाणी होत कडकडीत गरम ? स्वस्तात मस्त ८ देसी जुगाड - ऐन दुपारीही मिळेल थंडगार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2026 15:54 IST

how to keep water tank cool in summer : how to reduce water tank temperature during summer season : summer water tank cooling tips : ऐन उन्हाळ्यातही टाकीतील पाणी थंडगार ठेवण्याच्या ८ भन्नाट युक्त्या...

उन्हाळा सुरू झाला की घरातील अनेक छोट्या - मोठ्या अडचणी समोर येऊ लागतात, त्यापैकीच एक म्हणजे छतावरील पाण्याच्या टाकीतील गरम होणार पाणी. दिवसभर तळपणाऱ्या उन्हामुळे टाकीतील पाणी अक्षरशः उकळल्यासारखं गरम होतं, ज्यामुळे आंघोळ, स्वयंपाक किंवा इतर वापरासाठी ते पाणी वापरणं त्रासदायक ठरतं. विशेषतः दुपारच्या वेळेस तर नळातून येणारं पाणी थंडगार नसून चांगलंच कडकडीत गरमच असत...रणरणत्या उन्हाचा पारा जसजसा वाढतो  तसा त्याचा थेट फटका आपल्या घरावरील पाण्याच्या टाकीला बसतो(how to keep water tank cool in summer).

दिवसभर कडक उन्हात तापल्यामुळे टाकीतील पाणी इतके गरम होते की, साध्या अंघोळीसाठी किंवा हात-पाय धुण्यासाठीही ते वापरणे कठीण होते. अनेकदा तर थंड पाण्यासाठी ( how to reduce water tank temperature during summer season) आपल्याला रात्री उशिरापर्यंत वाट पाहावी लागते. दिवसभराच्या रणरणत्या उन्हात प्लास्टिकच्या टाक्या इतक्या गरम होतात की त्यातील पाण्याचे तापमानही कमालीचे वाढते. प्लास्टिकची टाकी दिवसभर उन्हात राहिल्यामुळे तिचं रूपांतर एका नैसर्गिक 'गीझर'मध्ये होतं. पण दरवर्षी हा त्रास सहन करण्याची गरज नाही. काही साध्या आणि स्वस्त ट्रिक्सच्या (how to keep water tank cool in summer) मदतीने आपण  ऐन उन्हाळ्यातही टाकीतील पाणी थंडगार ठेवू शकता, यासाठी नेमकं करायचं काय ते पाहूयात... 

भर उन्हाळ्यात टाकीतील पाणी थंड ठेवण्याचे सोपे उपाय... 

१. टाकीला पांढरा रंग द्या :- विज्ञानाच्या नियमानुसार पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही, तर ती परावर्तित करतो. जर तुमची टाकी काळ्या किंवा गडद रंगाची असेल, तर ती जास्त तापते. अशावेळी टाकीच्या बाहेरील बाजूला पांढरा 'रिफ्लेक्टिव्ह' पेंट किंवा साधा पांढरा चुना लावल्यास सूर्याची किरणे परावर्तित होतात आणि पाणी कमी प्रमाणात गरम होते. 

कपाट उघडताच कपड्यांचा ढीग अंगावर पडतो ? 'या' मिनिटभराच्या इन्स्टंट ट्रिकने कपाट राहील कायम नीटनेटकं...

२. टाकीवर कव्हर किंवा शेड लावा :- टाकीवर टिन, प्लास्टिक शीट किंवा ग्रीन नेटचं शेड लावल्यास थेट सूर्यप्रकाश टाळता येतो. यामुळे पाण्याचं तापमान कमी राहतं. शक्य असल्यास टाकीच्या वरच्या बाजूला थोडे अंतर सोडून बांबू आणि हिरव्या नेटचे (Green Net) छप्पर तयार करा. यामुळे सूर्याची किरणे थेट टाकीवर पडणार नाहीत. टाकी सावलीत राहिली तर पाणी गरम होण्याचे प्रमाण निम्म्याने कमी होते.

३. थर्माकोल किंवा गोणपाटाचे आवरण :- पाण्याच्या टाकीला बाहेरून थर्माकोलच्या शीट लावणे हा एक स्वस्त आणि मस्त उपाय आहे. जर थर्माकोल शक्य नसेल, तर साधे गोणपाट (जुनी पोती) ओले करून टाकीवर गुंडाळा. ही पोती दिवसातून दोन-तीनदा ओली केल्यास बाष्पीभवनामुळे (Evaporation) टाकीतील पाणी थंड राहण्यास मदत होते.

मुलं १० वर्षांची होण्याआधीच लावा 'या' १० सवयी! आयुष्यभर पाळतील शिस्त , होतील जबाबदार...  

४. पाईपचे इन्सुलेशन विसरू नका :- अनेकदा पाणी टाकीत थंड असते, पण टाकीतून नळापर्यंत येणारा पाईप उन्हात असल्यामुळे सुरुवातीला खूप गरम पाणी येते. या पाईप्सना पांढरा रंग लावा किंवा फोमचे इन्सुलेशन कव्हर गुंडाळा. यामुळे पाईपमधील पाणी तापणार नाही.

५. टाकीवर पाण्याचा शिडकावा करा :- दिवसभरात १ ते २ वेळा टाकीवर पाणी शिंपडल्यास तिचं तापमान कमी होण्यास मदत होते.

६. झाडे लावा :- टाकीच्या आजूबाजूला तुम्ही अनेक झाडे लावू शकता किंवा वेली असणारी झाडे लावल्याने तेथील तापमान कमी होते आणि उन्हाचा फारसा  परिणामही टाकीतल्या पाण्यावर होत नाही, परिणामी पाणी गार राहण्यास मदत होते. 

७. सुक किंवा ओलं गवत :- याशिवाय टाकीच्या आजूबाजूला सुकं किंवा ओलं गवत व्यवस्थित पसरवून घालावं. या गवतामुळे उष्णता थेट टाकीपर्यंत पोहोचत नाही आणि पाणी थंड राहते. यासोबतच टाकी थेट जमिनीवर ठेवण्याऐवजी एखाद्या स्टँडवर ठेवा. यामुळे खालून येणारी उष्णता थेट टाकीला लागत नाही आणि पाणी गरम होत नाही. 

८. टाकी सावलीत ठेवा :- शक्यतो पाण्याची टाकी थेट उन्हात न ठेवता भिंतीच्या सावलीत किंवा शेडखाली बसवावी. टाकीतील पाणी जास्त वेळ साठवून न ठेवता नियमित वापर केल्यास ते खूप गरम होत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Keep Tank Water Cool: 8 Cheap Tricks for Scorching Summer

Web Summary : Suffering from scalding hot water from your rooftop tank? Try these simple, affordable tricks: paint it white, use shade, insulate pipes, and keep it covered. Regular water usage and shaded placement also help maintain cooler temperatures.
टॅग्स :सोशल व्हायरलसमर स्पेशलहोम रेमेडी