आजकाल जवळजवळ प्रत्येक घराचे छत किंवा इमारतीवर पाण्याची मोठी काळी टाकी बसवलेली असते. या टाकीतील पाण्याचा वापर आपण दैनंदिन गरजांसाठी करतोच. मात्र टाकीतील पाणी स्वच्छ आणि कायम ताजं ठेवणं ही सर्वात मोठी अडचण असते. टाकी मोठी आणि वजनाने जड असल्याने त्याची साफसफाई आणि स्वच्छता ठेवणे मोठे कठीण काम असते. या मोठ्या टाक्यांची स्वच्छता करणे हे एक मोठे आणि जिकिरीचे काम असते. टाकी मोठी असल्याने वारंवार आत उतरून ती घासून पुसून साफ करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. कित्येकदा या टाक्या वेळेवर स्वच्छ न केल्यास आतून खराब होतात किंवा या टाकीवर आतून शेवाळ लागते, परिणामी पाणी देखील खराब होते. इतकच नाही तर, जर ही टाकी वेळेवर स्वच्छ केली नाही, तर त्यात साचलेला गाळ आणि शेवाळामुळे पाणी खराब होऊ लागते, पाण्याला विचित्र वास येऊ लागतो ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. असं पाणी आंघोळ, भांडी धुण्यासाठी किंवा पिण्यासाठी वापरणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. वारंवार टाकी स्वच्छ करणंही प्रत्येकाला सोपं नसतं, शिवाय सर्वांकडे फिल्टर किंवा केमिकल क्लीनरचा पर्याय उपलब्ध नसतो(how to keep water fresh for months put this traditional wood in your tank).
या समस्येवर उपाय आपल्या आजी-आजोबांकडे पूर्वीपासूनच होता. जुन्या काळात जेव्हा लोक कुंड्या, बंब किंवा मोठ्या मडक्यांमध्ये पाणी साठवून ठेवत असत, तेव्हा ते एक खास देसी उपाय वापरत. हा उपाय आजही तितकाच उपयुक्त आणि फायदेशीर मानला जातो. टाकीतील पाणी कायम स्वच्छ, जंतूमुक्त आणि फ्रेश ठेवण्यासाठीचा पारंपरिक (put this traditional wood in your water tank) उपाय नेमका काय आहेत ते पाहूयात...
जांभळाच्या झाडाची काडी किंवा लाकूड वापरण्याचा देसी उपाय काय आहे?
पाण्याच्या टाकीत जांभळाच्या झाडाची काठी टाकल्यास पाणी दीर्घकाळ ताजे राहते, असे मानले जाते. कारण या लाकडामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. हे गुणधर्म पाण्यात वाढणारे हानिकारक जंतू आणि बुरशी वाढू देत नाहीत. त्यामुळे पाणी लवकर खराब होत नाही. अनेकदा टाकीत धूळ साचल्यामुळे शेवाळ तयार होऊ लागते, ज्यामुळे पाणी दूषित होते. जांभळाच्या लाकडामुळे पाण्यात असे गुणधर्म उतरतात की, ज्यामुळे शेवाळ वाढू शकत नाहीत. यामुळे टाकी आतून जास्त काळ स्वच्छ रहाते आणि पाण्याला दुर्गंधी येत नाही.
जांभळाच्या झाडाचे लाकूड पाणी कसे ताजे ठेवते ?
जुन्या काळात लोक भांडी किंवा मडक्यात जांभळाच्या झाडाची काठी टाकत असत. यामागचे मुख्य कारण म्हणजे ही जांभळाच्या झाडाची फांदी पाण्यात लवकर सडत नाही. ही काठी पाण्यात दीर्घकाळ राहूनही तशीच टिकून राहते आणि तिचा परिणामही कायम राहतो. म्हणूनच आजही हा एक विश्वासार्ह देसी उपाय मानला जातो.
कॉटनची साडी नेसल्यावर फुगते, जाड दिसता? ८ टिप्स - कॉटनची साडी नेसा चापूनचोपून, मिळेल एलिगंट लूक...
पाणी ताजे ठेवण्यासाठी जांभळाच्या झाडाच्या लाकडाचे फायदे...
१. टाकीच्या पाण्यात किडे - कीटक पडत नाहीत.
२. पाण्याला दुर्गंधी येत नाही.
३. बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याचा धोका कमी होतो.
४. पाण्याची गुणवत्ता अधिक चांगली राहते.
५. टाकी वारंवार स्वच्छ करण्याची गरज पडत नाही.
पाण्यात जांभळाच्या झाडाचे लाकूड टाकण्याची योग्य पद्धत...
जांभळाच्या झाडाची एक स्वच्छ फांदी / काठी घ्या. १००० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीसाठी सुमारे २०० ग्रॅम लाकूड पुरेसे असते. लाकडी काठी नीट धुवून स्वच्छ करा. टाकीत पाणी भरण्यापूर्वी ती काठी टाकीत ठेवा. दर १५ ते ३० दिवसांनी ही काठी बदलणे अधिक फायदेशीर ठरते. जर तुम्हाला कोणतेही केमिकल न वापरता, घरगुती पद्धतीने पाण्याच्या टाकीतील पाणी स्वच्छ ठेवायचे असेल, तर जांभळाच्या लाकडाचा हा जुना - पारंपरिक घरगुती उपाय नक्की वापरून पाहा.
Web Summary : Tired of cleaning your water tank? Use a branch of the Jamun tree! Its antibacterial properties keep water fresh, prevent algae, and eliminate odors, reducing the need for frequent cleaning. A traditional and effective solution for clean water.
Web Summary : पानी की टंकी साफ करने से थक गए हैं? जामुन के पेड़ की एक शाखा का उपयोग करें! इसके जीवाणुरोधी गुण पानी को ताज़ा रखते हैं, शैवाल को रोकते हैं, और गंध को खत्म करते हैं, जिससे बार-बार सफाई की आवश्यकता कम हो जाती है। स्वच्छ पानी के लिए एक पारंपरिक और प्रभावी समाधान।