आपल्या घरात रोज भात खाल्ला जातो. स्वयंपाकघरातला सर्वात महत्त्वाचा आणि रोज लागणारा घटक हा तांदूळ. भात, पोहे, इडली, डोसा, खीर, पुलाव..(how to store rice without insects) अशी असंख्य चव तांदुळाशिवाय अपूर्ण राहते. त्यासाठीच तांदूळ घरात महिनाभर, कधी कधी तर वर्षभर साठवून ठेवला जातो.(prevent fungus in rice)
तांदूळ जरा चुकीच्या पद्धतीने साठवला, चुकीच्या ठिकाणी ठेवला तर काही दिवसांत त्यावर बुरशी, कीड किंवा अळ्या तयार होतात.(rice storage tips at home) डब्बा उघडला आणि आत पांढऱ्या सूक्ष्म अळ्या इकडे-तिकडे सरपटताना दिसल्या किंवा बुरशीमुळे तांदुळाला विचित्र वास यायला लागतो.(natural ways to keep rice fresh) पावसाळ्यात वातावरण थंड असते. आपण तांदूळ मोठ्या पिशव्यांमध्ये किंवा डब्यांमध्ये साठवतो. पण वातावरणात आर्द्रता जास्त असल्यामुळे किंवा डब्बा पूर्ण कोरडा न ठेवता त्यात तांदूळ भरल्यास, त्यातून बुरशी आणि कीटक वाढतात.(stop worms in rice) तसेच कधी कधी आपण बाजारातूनच जुनाट तांदूळ आणतो आणि काही दिवसांत त्यात कीड दिसायला लागते. ज्यामुळे अळ्या-बुरशी लागण्याची समस्या जास्त असते. अशावेळी ही खास जादुई पोटली उपयुक्त ठरेल.(rice storage hacks without chemicals)
महानवमी स्पेशल: १५ मिनिटांत होईल सफरचंदाची खीर, देवीसाठी होईल शाही नैवैद्य - करायलाही सोपी
तांदळातील किडे काढण्यासाठी आपल्याला टिश्यू पेपरमध्ये २ चमचे मीठ, दीड चमचा हळद, ७ लवंगा आणि २ कापूर गोळ्या घालून याची पोटली तयार करा. ही पोटली घट्ट बांधू नका. याचा वास पसरेल इतकी उघडी ठेवा. कापूर, लवंगच्या तीव्र वासामुळे कीटक तांदळातून बाहेर पडतात. जर आपल्याला पोटली बनवायची नसेल तर तांदळात मीठ, हळद आणि लवंग घालू शकता. कापूर घालणे टाळा. कापूरमुळे याचा वास भातला जास्तच पसरु लागतो.
तांदूळ साठवताना त्यात मीठ आणि लवंग घाला. दमट हवामानामुळे मीठ ओलावा शोषून घेते आणि लवंगाचा वास कीटकांना दूर ठेवतो. आपल्याला हवं असल्यास आपण हिंग कापडात बांधून तांदळाच्या डब्यात ठेवू शकता. ज्यामुळे बुरशी- कीड लागणार नाही. सगळ्यात जुनी आणि सोपी पद्धत माचीस काड्या डब्यात घालणे. याच्या टोकावरील सल्फरच्या वासाने तांदळाला कीड-बुरशी लागत नाही.