लग्न किंव सण-समारंभ म्हटलं की केसात मोगऱ्याचा गजरा हवाच. मराठमोळ्या सौंदर्याचं लेणं म्हणजे हातावरची मेहंदी आणि केसातला सुगंधी 'मोगऱ्याचा गजरा'. सण-समारंभ असो वा एखादं विशेष कार्य, गजरा माळल्याशिवाय स्त्रीचा साज पूर्णच होत नाही.(How to store flowers) पण, गजऱ्याचं मोठं दुःख म्हणजे त्याचा क्षणभंगुर ताजेपणा! सकाळी आणलेला टवटवीत आणि सुगंधी गजरा दुपारपर्यंत कोमेजून जातो आणि संध्याकाळपर्यंत तो काळा पडतो आणि त्याचा सुगंधही उडून जातो.(Keep flowers fresh) मग तो केसातून काढून फेकून देण्यावाचून आपल्याकडे पर्याय उरत नाही. अनेक महिलांना हा प्रश्न पडतो की, हा गजरा किमान दोन-तीन दिवस तरी टिकवता येईल का? (Mogra storage tips)
सध्या सोशल मीडियावर एक 'सुपर ट्रिक' प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये असं सांगण्यात येत आहे की आवडता गजरा तब्बल ८ दिवस ताजा आणि सुगंधी राहू शकतो. लोक म्हणतात की गजरा कोमेजू नये म्हणून तो पाण्यात ठेवावा किंवा ओल्या कपड्यात गुंडाळावा, पण ही नवीन पद्धत तर त्याहूनही सोपी आणि प्रभावी आहे. यामध्ये ना पाण्याचा वापर आहे ना कोणत्याही महागड्या स्प्रे चा. फक्त एक साधा डबा आणि आपल्या घरातील फ्रीजचा वापर करून आपण गजऱ्याचा ताजेपणा कायम राखू शकतो.
पपई चिरण्याची भन्नाट युक्ती, १ स्टिलचा डबा-१ सुरी एवढं फक्त घ्या- बघा झटपट काम
सोशल मीडियावर Khandesh Zaika या पेजवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. सध्या घरगुती जुगाडाने धुमाकूळ घातला आहे. मोगरा, जुई किंवा सायलीचा गजरा लवकर सुकू नये म्हणून जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. अनेकदा आपण गजरा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवतो आणि ही पिशवी फ्रीजमध्ये ठेवतो. किंवा गजरा आपण बाहेर ठेवतो, ज्यामुळे हवेतील उष्णतेने तो लवकर काळा पडतो. पण गजरा साठवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे.
सगळ्यात आधी आपल्याला स्वच्छ आणि कोरडा स्टीलचा डबा घ्यावा लागेल. डब्याच्या तळाशी एक कोरडा टिश्यू पेपर किंवा सुती कापड ठेवा. यामुळे डब्यातील ओलावा शोषला जाईल. गजरा गुंडाळून तो टिश्यूवर ठेवा. वरुन पुन्हा एक टिश्यू पेपरने झाकून ठेवा. आता डब्याचे झाकण घट्ट बंद करा. यामुळे बाहेरील हवा आत जाणार नाही. हा डबा फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठेवून द्या.
जेव्हा आपण गजरा एअरटाईट डब्यात ठेवून तो फ्रीजमध्ये ठेवतो, तेव्हा फुलांमधील आर्द्रता टिकून राहते. फ्रीजमधील कमी तापमानामुळे फुलांच्या पाकळ्या कोमेजण्याची प्रक्रिया कमी होते. टिश्यू पेपरमुळे डब्यात जास्त बाष्प साचत नाही, यामुळे फुले सडत नाहीत आणि त्यांचा सुगंधही तसाच राहतो.
