स्वयंपाकघरातील सर्वात छोटी पण सगळ्यात उपयोगाची गोष्ट अर्थात लिंबू. घरात सलाद बनवायचे असो, कढीला आंबटपणा आणायचा असो किंवा लेमन वॉटर प्यायचे असो, चहाला खास फ्लेव्हर द्यायचा असो.(How to store lemons) लिंबूशिवाय घरातला एकही दिवस पूर्ण होत नाही.(Keep lemons fresh) लिंबूमध्ये एसिडीत असते त्यासाठी तो योग्य प्रमाणात साठवायला हवा.
इतर भाज्या-फळांसारखं लिंबूही फ्रीजमध्ये ठेवताना काळजी घ्यायला हवी. अनेकदा आपण आठवड्याभरासाठी लिंबू आणून फ्रीजच्या कोपऱ्यात टाकून देतो. पण काही दिवसांनी हातात घेताच ते सुकतात, लालसर पडतात किंवा कडक होतात. (Lemon storage tips)
अनेकजण लिंबू फ्रीजरमध्ये ठेवतात. परंतु ओलाव्यामुळे त्याचा रस कमी होतो किंवा ते आतून पूर्णपणे सुकतात. पण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर आठवडाभर लिंबू ताजे आणि रसाळ राहू शकतात. तसेच एकही लिंबू खराब होणार नाही.
१५ मिनिटांत करा ढाबास्टाइल गरमागरम चना पालक मसाला, चमचमीत रेसिपी- ऑफिसचा डबा होईल टेस्टी
1. लिंबू ताजे आणि फ्रेश ठेवण्याचा सोपा उपाय म्हणजे कापल्यानंतर हवाबंद डब्यात साठवणे. चिरलेला लिंबू खालच्या बाजूने ठेवावा. ज्यामुळे लिंबाचा ओलावा कायम टिकून राहतो आणि हवेशी संपर्क कमी येतो. जर डबा पूर्णपणे सीलबंद असेल तर लिंबू एक आठवड्यापर्यंत फ्रेश राहातील.
2. अर्ध्या लिंबाच्या फोडीला बाजूने मीठ चोळा किंवा साखर देखील लावू शकता. दोन्ही ओलावा बाहेर जाण्यापासून रोखतात. लिंबू एका लहान प्लेट किंवा भांड्यात उलटा ठेवा. या पद्धतीमुळे लिंबू जास्त दिवस रसाळ राहतो. मीठामुळे लवकर खराब होत नाही, तसेच चवही टिकून राहते.
3. हवाबंद डब्यात लिंबू ठेवायचा नसेल तर प्लास्टिक रॅप किंवा अॅल्युमिनियम फॉइल चांगले काम करते. हवा आत जाऊ नये म्हणून लिंबाची कापलेली बाजू घट्ट गुंडाळा. नंतर फ्रीजमध्ये ठेवा. ही पद्धत लिंबांना एक ते दोन आठवड्यांपर्यंत हायड्ररेट ठेवते. तसेच चव देखील तशीच राहते.
4. लिंबाच्या चिरलेल्या फोडीला रिफाइंड तेल किंवा मोहरीचे तेल लावायला हवे. यामुळे त्यावर थर तयार होतो. कापलेल्या बाजूचा ओलावा बाहेर पडण्यापासून रोखले जाते. त्यानंतर लिंबू एका छोट्या कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. या पद्धतीमुळे लिंबू अनेक दिवस ताजे आणि रसाळ राहाण्यास मदत राहिल.
