Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात फ्रीजचं कूलिंग होत नाहीये? सेटिंगमध्ये करा १ बदल, बर्फ होईल तयार- वीजबिलही येईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2026 12:54 IST

Reduce refrigerator electricity bill tips: Fridge maintenance tips for summer: उन्हाळ्यात फ्रीजची कूलिंग वाढवणारी ती 'मॅजिक सेटिंग' नेमकी कोणती.

उन्हाळा सुरु झाला की आपल्या घराघरात फ्रीजचा वापर कैक पटीने वाढतो. बाहेरचे तापमान ४० अंशांच्या पार जाऊ लागले की, घशाला कोरड पडते आणि थंडगार पाणी प्यावंसं वाटतं. पण अनेकदा असं होतं की, ऐन उन्हाळ्यात आपला फ्रीज हवा तसा थंड होत नाही.(Reduce refrigerator electricity bill tips) फ्रीजरमध्ये बर्फ जमा व्हायला तासनतास लागतात, बाटल्यांमधलं पाणी थंड होत नाही. फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध किंवा भाज्या लवकर खराब होतात अशावेळी आपल्याला वाटतं की फ्रीज खराब झालं. पण प्रत्येक वेळी फ्रीज खराब झाला असेलच असं नाही.(Fridge maintenance tips for summer) उन्हाळ्यात बाहेरील हवा गरम असल्याने फ्रीजच्या कॉम्प्रेसरवर अतिरिक्त ताण येतो. (How to fix fridge cooling issue at home)आपल्या फ्रीजमध्ये अशी एक सेटिंग असते. जी बदलल्यावर आपला फ्रीज पुन्हा नव्यासारखं कूलिंग देऊ शकतो. यामुळे केवळ पदार्थ ताजे राहतील असं नाही, तर कॉम्प्रेसरवरचा भार कमी झाल्यामुळे तुमच्या वीजबिलातही मोठी कपात होईल. चला तर मग जाणून घेऊया, उन्हाळ्यात फ्रीजची कूलिंग वाढवणारी ती 'मॅजिक सेटिंग' नेमकी कोणती. (Fridge cooling setting in Marathi)

१५ दिवस जास्त पुरेल गॅस, पाहा स्वयंपाकाचा गॅस बचतीसाठी ५ स्मार्ट ट्रिक्स, स्वयंपाक झटपट-गॅसचीही बचत

1. फ्रीजच्या आत एक गोल नॉब असते. ज्यावर १ ते ७ किंवा Winter, Monsoon आणि Summer असं लिहिलेले असते. उन्हाळ्यात बाहेरील तापमान जास्त असल्याने फ्रीजमधील उष्णता बाहेर टाकण्यासाठी कॉम्प्रेसरला जास्त काम करावं लागतं. जर आपलं सेटिंग १ किंवा २ वर असेल तर कूलिंग कमी होईल. उन्हाळ्यात हे सेटिंग ५ ते ७ मोडवर ठेवा. यामुळे फ्रीजमधील तापमान कमी राहते आणि बर्फ तयार होतो.

2. फ्रीजच्या मागे किंवा खाली काळ्या रंगाच्या जाळ्या असतात. उन्हाळ्यात यावर धूळ साचल्यास फ्रीजमधील उष्णता बाहेर पडू शकत नाही, ज्यामुळे कूलिंग कमी होते. वर्षातून निदान दोनदा या कॉइल्स क्युम क्लीनर किंवा कापडाने साफ करायला हव्या. 

3. अनेकदा आपण फ्रीजमध्ये भाज्या किंवा इतर पदार्थ कोंबतो. ज्यामुळे थंड हवा फिरण्यासाठी जागा उरत नाही. फ्रीजच्या मागील बाजूला असलेल्या छिद्रांमधून थंड हवा येत असते. जर ती छिद्रे डब्यांनी झाकली गेली, तर फ्रीज गरम होऊ लागतो.

4. फ्रीजचा दरवाजा नीट लागत नसेल तर बाहेरील गरम हवा आत शिरते. यामुळे फ्रीजला सतत कूलिंग करावं लागतं, ज्यामुळे वीजबिल वाढतं. अशावेळी रबर पट्टी बदला. 

5. उन्हाळ्यात फ्रीज भिंतीला अगदी चिकटवून ठेवू नका. खेळती हवा राहिल अशा ठिकाणी ठेवा. यामुळे कॉम्प्रेसरमधून निघणारी उष्णता सहज बाहेर पडते आणि फ्रीजवर ताण येत नाही.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fix Fridge Cooling in Summer: Adjust Settings, Save Energy!

Web Summary : Summer fridge not cooling? Adjust the thermostat, clean coils, avoid overcrowding, check door seals, and ensure proper ventilation. These tips improve cooling and lower electricity bills.
टॅग्स :सोशल व्हायरलसमर स्पेशल