Join us

वॉशिंग मशीनमधून येते कुबट दुर्गंधी? फक्त २ पदार्थ करतील जादू, कुबट दुर्गंधी - घाण होईल मिनिटात नाहीशी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2025 18:33 IST

How To Get Rid Of The Damp Smell From Washing Machine : How to Clean a Smelly Washing Machine : Washing Machine Smells and How To Get Rid of Them : महागड्या क्लिनर्सपेक्षा घरातील फक्त २ पदार्थांनी आपण वॉशिंग मशीन मिनिटात स्वच्छ करु शकतो.

कपडे धुण्यासाठी आजकाल सगळेचजण बऱ्यापैकी वॉशिंग मशीनचाच वापर करतात. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्याने फारसे कष्ट न घेता अगदी झटपट कपडे स्वच्छ धुता येतात. असे असले तरीही कितीही वेगवेगळ्या प्रकारचे डिटर्जंट वापरले तरीही, काहीवेळा वॉशिंग मशीनमधून धुतलेल्या कपड्यांना कुबट दुर्गंधी येऊ लागते. वॉशिंग मशीनमध्ये (How To Get Rid Of The Damp Smell From Washing Machine) कपडे कितीही स्वच्छ धुतले तरीही, त्यांना कुबट दुर्गंधी ( How to Clean a Smelly Washing Machine) येण्याचं मुख्य कारण म्हणजे मशीनची वेळच्या वेळी योग्य स्वच्छता न होणं. काही ठिकाणी जमलेली बुरशी, डिटर्जंटचा थर किंवा ओलसरपणा असतो यामुळे मशीन आतून अस्वच्छ होऊन त्यातून कुबट - घाण दुर्गंधी येऊ लागते(Washing Machine Smells and How To Get Rid of Them).

मशीन वेळीच आतून योग्य प्रकारे स्वच्छ न केल्यास त्यातील घाण कपड्यांना चिकटते आणि कपड्यातून घाण - कुबट दुर्गंधी येऊ लागते. स्वच्छ कपडे हवे असतील, तर फक्त डिटर्जंट पुरेसं नाही, तर वॉशिंग मशीनही स्वच्छ असणं तितकंच गरजेचं आहे. जर कपडे धुतल्यानंतरही त्यातून घाण वास येत असेल, तर तुमची वॉशिंग मशीन आतून स्वच्छ करण्याची ही योग्य वेळ आहे असे समजावे. वॉशिंग मशीन स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लिनर्सपेक्षा आपण घरातील फक्त २ पदार्थांचा वापर करुन वॉशिंग मशीन मिनिटात स्वच्छ करु शकतो. 

वॉशिंग मशीन आतून स्वच्छ करण्यासाठी... 

१. हेअर शाम्पू :- शाम्पू फक्त केस धुण्यासाठीच नाही, तर तो एक माईल्ड क्लीनर म्हणूनही काम करतो. वॉशिंग मशीनच्या आत साचलेला डिटर्जंटचा थर, घाण आणि बॅक्टेरिया हे शाम्पूमुळे हळूहळू निघून जातात. रासायनिक आणि महागडे क्लीनर न वापरता, तुमच्याच बाथरूममधील शाम्पूने तुम्ही मशीन चमकदार आणि दुर्गंधीमुक्त ठेवू शकता. यासाठी मशीनच्या ड्रममध्ये, १/२ कप शाम्पू घालून मग हॉट वॉटर मोडवर मशीन १० ते १५ मिनिटे मशीन फिरवून घ्यावी. ५ मिनिटे मशीन फिरवून झाल्यावर १० मिनिटांसाठी मशीनमध्ये हे पाणी असेच राहू द्यावे. यामुळे मशीनची खोलवर सफाई होण्यास मदत होईल. त्यानंतर हे शाम्पू चे पाणी मशीनमधून काढून त्यात नवीन स्वच्छ पाणी भरून मशीन पुन्हा एकदा फिरवून पाण्याने आतून स्वच्छ करून घ्यावी. या उपायामुळे मशीनमधील घाण, कुबट दुर्गंधी नाहीशी होऊन सुंदर शाम्पूचा सुगंध येऊ लागेल. 

प्रेशर कुकरचे रबर सैल झाले, वाफ बाहेर येते? सोपे ५ उपाय, एकदम चटकन करा दुरुस्त...

२. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर :- शाम्पू प्रमाणेच आपण बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा देखील वापर करू शकतो. यासाठी एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर समप्रमाणात ओतून त्याची पातळसर पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट मशीनच्या ड्रममध्ये घालून मग हॉट वॉटर मोडवर मशीन १० ते १५ मिनिटे मशीन फिरवून घ्यावी. असे ३ ते ४ वेळा मशीन फिरवून घ्यावी. त्यानंतर हे पाणी सोडून देऊन नवीन पाणी भरून मशीन आतून स्वच्छ पाण्याने धुवून  घ्यावी. 

वेटलॉससाठी मेथी दाणे की बडीशेप काय फायदेशीर? डॉक्टर सांगतात, वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावं ?

इतरही गोष्टी लक्षात ठेवा... 

१. वॉशिंग मशीन वापरल्यानंतर त्याचे झाकण उघडे ठेवा, जेणेकरून आतला ओलावा वाळला जाईल आणि फंगस तयार होणार नाही.

२. दर तिसऱ्या दिवशी डिटर्जंट टाकण्याचा ट्रे बाहेर काढून स्वच्छ करा. या ट्रेमध्ये साबण साचल्यामुळे सुद्धा घाण - कुबट दुर्गंधी येऊ शकते. 

३. महिन्यातून एकदा वॉशिंग मशीनचा फिल्टर स्वच्छ करा. तो मशीनच्या खालच्या बाजूने बाहेर काढून हलक्या ब्रशने साफ करायला विसरू नका.

४. धुतलेले कपडे मशीनमध्ये तासंतास ठेवू नका. वॉशिंग पूर्ण झाल्यावर कपडे लगेच बाहेर काढा, नाहीतर त्याला कुबट वास येतो.

५. शाम्पू आणि बेकिंग सोडा हे घरगुती उपाय वापरून तुम्ही केवळ मशीनच नाही, तर कपड्यांमधील दुर्गंधी देखील सहज दूर करू शकता.

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडीस्वच्छता टिप्स