Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा टोमटो - आल्याचा तुकडा, उंदरांना पळवण्याचा घरगुती उपाय - होईल कायमचा बंदोबस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2026 17:49 IST

how to get rid of rats from house without killing : how to remove rats from home naturally : उंदरांना घरातून कायमचे पळवून लावण्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती उपाय आहे फायदेशीर...

घर कितीही स्वच्छ ठेवले तरी कधी ना कधी उंदीर घरात शिरकाव करतातच. एकदा का उंदीर घरात आले की घरांतील वस्तूंची फार मोठ्या प्रमाणावर नासधुस करतात. कधी महागडे कपडे कुरतडणे, कधी धान्याची नासाडी करणे, तर कधी विजेच्या तारा तोडून मोठे नुकसान करणे, असे प्रकार उंदीर करत राहतात. उंदीर फक्त सामानाचे नुकसान करत नाहीत, तर ते आपल्यासोबत अनेक प्रकारचे आजार आणि संसर्ग देखील घेऊन येतात, जे कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात(how to get rid of rats from house without killing).

घरात उंदीर येणे ही अनेक घरांमधील मोठी आणि त्रासदायक समस्या आहे. विशेष म्हणजे एकदा घरात शिरले की हे उंदीर सहजासहजी घर सोडत नाहीत आणि रात्रीच्या वेळी अधिक धुमाकूळ घालतात. अनेकदा आपण उंदरांना मारण्यासाठी बाजारातील विषारी औषधे किंवा गोळ्या वापरतो, पण घरात लहान मुले किंवा पाळीव प्राणी असतील तर अशा औषधांचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. तसेच, उंदीर घरातच मेला तर त्याची दुर्गंधी सुटते ती वेगळीच! म्हणूनच, उंदरांना न मारता त्यांना घरातून कायमचे पळवून लावण्यासाठी काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय करणे केव्हाही फायदेशीरच ठरते. अशा परिस्थितीत, घरात उंदीर धुमाकूळ घालत असतील आणि घरातून जाता जात नसतील तर त्यांना दूर ठेवण्यासाठी एक घरगुती उपाय ठरेल असरदार...घरातून उंदरांना (how to remove rats from home naturally) पळवून लावण्यासाठी घरातीलच काही नेहमीच्या पदार्थांचा वापर करून घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरू शकते. 

घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी खास घरगुती उपाय... 

सर्वात आधी दोन ताजे टोमॅटो घ्या आणि त्यांचे मधून दोन भाग करा. आता चमच्याच्या साहाय्याने टोमॅटोच्या आतील सर्व गर (Pulp) काढून वेगळा करा. आता तुमच्याकडे टोमॅटोची रिकामी टरफले उरतील, जी छोट्या वाटीसारखी दिसतील. या वाट्यांचा वापर आपण मिश्रण भरण्यासाठी करणार आहोत. टोमॅटोचा वास उंदरांना स्वतःकडे खूप लवकर आकर्षित करतो.

आता आल्याचा एक तुकडा नीट धुवून बारीक किसून घ्या. आल्याचा वास आणि चव खूप तीव्र आणि उग्र असते, ज्याचा उंदरांवर वाईट परिणाम होतो. आल्याचा हा किस एका डिस्पोजेबल कप किंवा वाटीत काढा. यासाठी डिस्पोजेबल भांडे वापरा, जेणेकरून आपल्या रोजच्या जेवणातील भांडी खराब होणार नाहीत.

तवा-कढई-चहाच्या भांड्याच्या हॅण्डलजवळ काळाकुट्ट मेणचट थर जमला? १ उपाय, ५ मिनिटांत भांडण नव्यासारखं चकाचक...

आई गं! ड्रिल मशीन वापरुन केला सरसो का साग, पाहा पंजाबी भाजीचा व्हायरल भन्नाट व्हिडिओ....

आल्याचा किस असलेल्या कपमध्ये एक चमचा तिखट लाल मिरची पावडर टाका. त्यानंतर, यामध्ये थोडे टॉयलेट क्लीनर मिसळा. लाल मिरची आणि क्लीनरचे हे मिश्रण अत्यंत शक्तिशाली असते. हे एकत्र करताच एक घट्ट पेस्ट तयार होईल. हे मिश्रण उंदरांसाठी अत्यंत त्रासदायक आणि असह्य असते.

तयार केलेली ही घट्ट पेस्ट टोमॅटोच्या त्या वाट्यांमध्ये भरा. उंदरांना वाटेल की हे त्यांच्या खाण्यासारखे काहीतरी आहे, पण जशी ते याची चव घेतील, तिखटपणा आणि केमिकल यामुळे उंदरांना अस्वस्थ वाटेल. हे तयार केलेले टोमॅटो घराच्या अशा कोपऱ्यांत ठेवा जिथे उंदरांचा वावर सर्वात जास्त असतो. जसे की, सिंकच्या खाली, कपाटाच्या मागे किंवा स्टोअर रूममध्ये. टोमॅटोचा वास त्यांना जवळ खेचून आणेल आणि त्यातील मिश्रणाचा परिणाम उंदरांना घराबाहेर पळून जाण्यास भाग पाडेल. 

काही सेंकदांचं रिल मुलांसाठी थोडं थोडं विष, ५ लक्षणं दिसली तर समजा आपलं मूल धोक्यात आहे!

या घरगुती उपायाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे घरात कुठेही उघड्यावर पाणी नसावे. हे मिश्रण खाल्ल्यानंतर उंदरांना प्रचंड अस्वस्थता जाणवते आणि खूप तहान लागते. जर त्यांना घराच्या आत पाणी मिळाले, तर ते वाचू शकतात. मात्र, पाणी न मिळाल्यास ते पाण्याच्या शोधात ते लगेच घराबाहेरच्या दिशेने पळ काढतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Tomato, ginger trick: Natural home remedy to repel rats effectively.

Web Summary : Rats cause damage and spread diseases. This article suggests using tomato, ginger, chili powder, and toilet cleaner mix to create a rat repellent. Place the mixture in tomato halves where rats frequent, and ensure no open water sources are available.
टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी