Join us
Daily Top 2Weekly Top 5

कबुतरांना अजिबात आवडत नाहीत स्वयंपाकघरातील ४ पदार्थ! पाहताक्षणी कबुतरं पळतात-परत फिरकत नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2025 19:16 IST

how to get rid of pigeons naturally : pigeon problem solution at home : tricks to stop pigeons from balcony : how to prevent pigeons from entering balcony : कबुतरांना इजा न पोहोचवता, कायमस्वरूपी घर किंवा गॅलरीतून पळवून लावण्यासाठी पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोपे उपाय...

आपल्यापैकी बऱ्याचजणांनी कबुतर आणि त्यांचा वावर किंवा विष्ठेमुळे होणारा त्रास अनुभवला असेलच. कबुतरांना बाहेर काढण्यासाठी कितीही हाकललं किंवा हुसकावून लावलं तरी ती पुन्हा पुन्हा येतातच. कधी खिडकीच्या कोपऱ्यात घरटं बांधतात, तर कधी गॅलरीभर घाण करून ठेवतात. घराची गॅलरी, खिडकी किंवा बाल्कनीत सतत वावरणारे कबुतर म्हणजे डोक्याला त्रासच... कबुतरांच्या सततच्या ये - जा करण्यामुळे आणि विष्ठमुळे आपल्याला नकोसे वाटू लागते. कबुतरांच्या घाणीमुळे घर तर अस्वच्छ होतेच, पण त्यांच्या विष्ठेतून निर्माण होणारे जंतू आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या  दिवसाची सुरुवात (pigeon problem solution at home) कबुतरांची घाण साफ करण्यानेच होते आणि याच गोष्टीचा त्रास होऊ लागतो. कबुतरांनी केलेल्या विष्ठेमुळे दुर्गंध, डाग आणि अस्वच्छता पसरते. अनेकजण यावर उपाय म्हणून नेट, स्प्रे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करून पाहतात पण त्याचा फारसा फायदा होत नाही. जर तुम्ही या समस्येवर कोणताही उपाय न मिळाल्याने कंटाळले असाल, तर तुमच्यासाठी एक अगदी सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे(how to get rid of pigeons naturally).

कबुतरांना इजा न करता, फक्त घरगुती उपायांनी त्यांना घर किंवा गॅलरीपासून दूर ठेवणे पूर्णपणे शक्य आहे. कबुतरांना कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता, त्यांना कायमस्वरूपी आपल्या घर किंवा गॅलरीतून पळवून (tricks to stop pigeons from balcon) लावण्यासाठी पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोपे असे (How to get rid of pigeons using trick) काही घरगुती उपाय आणि युक्त्या पाहूयात...

कबुतरांना पळवून लवण्यासाठी खास घरगुती उपाय... 

१. पुदिन्याचे तेल (Peppermint Oil) :- कबुतरांना पुदिन्याचा उग्र, तिखट आणि तीव्र गंध अजिबात सहन होत नाही. पुदिन्याचे तेल पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे बाल्कनीची रेलिंग, खिडकीचे कोपरे आणि कबुतरे बसण्याच्या ठिकाणी दररोज स्प्रे करावा.

२. व्हाईट व्हिनेगर (White Vinegar) :- व्हिनेगरच्या तीव्र आंबट वासामुळे कबुतरे दूर पळतात. पाणी आणि व्हाईट व्हिनेगर समप्रमाणात मिसळून त्याचा स्प्रे करावा. यामुळे घाण साफ होण्यासही मदत होते.

गुडघ्यापर्यंत लांब केस  हवे तर करा 'या' तेलानं करा मसाज, केस इतके वाढतील , की सांभाळणंही कठीण...

बाबा, माझा ११ वर्षांपासून बॉयफ्रेंड आहे! मुलीचं अफेअर कळताच वडिलांनी केलं असं काही की...

३. लाल मिरची पावडर (Red Chilli Powder) :- मिरचीचा तिखट वास आणि जळजळ निर्माण करणारे घटक कबुतरांना त्या जागेपासून दूर ठेवतात. मिरची पावडर पाण्यात मिसळून स्प्रे करावा किंवा जिथे कबुतर बसतात तिथे माती आणि रेतीमध्ये मिसळून शिंपडावी.

४. दालचिनी पावडर (Cinnamon Powder): - दालचिनीचा तीव्र आणि मसालेदार सुगंध कबुतरांना अजिबात आवडत नाही. कबुतरं बसतात त्या जागी दालचिनी पावडर शिंपडल्यास त्याच्या उग्र वासाने कबुतर पुन्हा फिरकणार देखील नाही. 

इतरही उपाय लक्षात ठेवा... 

१. स्वच्छता :- सर्वातआधी कबुतरांची विष्ठा नीट साफ करा, कारण विष्ठेच्या वासामुळे कबुतरं पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतात.

२. बॅरियर लावा :- खिडकी किंवा बाल्कनीसाठी पातळ जाळी किंवा 'पिजन स्पाइक्स' बसवा, ज्यामुळे त्यांना बसण्यासाठी जागाच उरणार नाही.

३. चमकदार वस्तू :- बाल्कनीमध्ये ॲल्युमिनियम फॉईल किंवा जुन्या CD/DVD लटकवा. त्यांच्या चमकामुळे कबुतरं घाबरून जवळ येत नाहीत.

हे सर्व उपाय पर्यावरणपूरक आणि सुरक्षित असून यामुळे कबुतरांना कोणतीही इजा न होता तुम्ही घर स्वच्छ ठेवू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Kitchen ingredients pigeons hate: Natural ways to deter them.

Web Summary : Pigeons dislike strong scents. Peppermint oil, white vinegar, red chili, and cinnamon powder repel them. Clean regularly and use barriers to keep pigeons away humanely.
टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडी