Join us  

घरात पालींचा सुळसुळाट? लसूण-कॉफीचा भन्नाट उपाय, पाल घरात पुन्हा फिरकणारही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2023 12:31 PM

How to get rid of lizards at home : चिंता सोडा ! आता घरात पाल चुकचुकणार नाही, करून पाहा ५ सोपे उपाय

अनेकांच्या घरात चुकचुकणारी पाल (Lizard) असतेच. दार किंवा खिडक्या वाटे एखादी पाल घरात शिरली तर, तिला घराबाहेर घालवायची कशी असा प्रश्न पडतो. कारण पालीला बघताच क्षणी अनेकांच्या अंगावर काटा येतो. तिला पाहून लहानच काय मोठी माणसं देखील घाबरतात. पाल कधी कुठे फिरेल सांगता येत नाही. सरपटत ती अनेकदा किचनमध्ये देखील जाते. अन्नात जर पाल फिरली तर, आपल्याला अन्नातून विषबाधा देखील होऊ शकते.

बऱ्याच हॉटेलमध्ये अन्नात पाल पडून विषबाधा झाल्याचेही आपण ऐकले असेल. त्यामुळे घरात पाल दिसताच तिला घालवण्यासाठी केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर न करता, घरगुती २ सोप्या उपायांना फॉलो करून पाहा. या उपायांमुळे काही मिनिटात पाल घराबाहेर पडेल(How to get rid of lizards at home).

काळी मिरी आणि लाल तिखट

काळी  मिरीच्या उग्र वासामुळे घरात पाल राहत नाही. जर पाल घरात शिरली असेल तर, तिला घालवण्यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घ्या, त्यात समप्रमाणात लाल तिखट आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करा. तयार पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा, व ज्या ठिकाणी पाल फिरते त्या जागी स्प्रे करा, किंवा पालीवर शिंपडा.

तेल-धुरामुळे किचनच्या खिडक्या कळकट-मेणचट झाल्या? बेकिंग सोड्याचा सोपा उपाय, खिडक्या चकाचक चमकतील

कॉफी

पालीला घरातून पळवून लावण्यासाठी आपण कॉफी पावडरचा वापर करू शकता. यासाठी कॉफी पावडरमध्ये तंबाखू मिसळा आणि त्यापासून लहान गोळे तयार करा. जिथे पाली जास्त वेळ फिरतात, त्या ठिकाणी हे गोळे ठेवा. यामुळे पाल घरातून पळून जाईल.

लसूण

लसणाच्या उग्र वासामुळे पाली घरात शिरत नाही. यासाठी खिडक्या, दारे इत्यादींवर लसणाच्या पाकळ्या ठेवा. यामुळे पाल घरात शिरणार नाही.

डांबर गोळी

नॅप्थालीन बॉल्स पाली नसून, झुरळं आणि इतर कीटकांना पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी घरातील विविध कोपऱ्यात डांबर गोळ्या ठेवा. यामुळे घर कीटकमुक्त राहील.

भाजी चिरताना चिडचिड होते, चाकूला धारच नाही? चहाच्या कपची १ सोपी ट्रिक, लावा झटपट धार

थंड पाणी

पाली थंड जागेवर किंवा थंड पाण्याजवळ जात नाही. पाल दिसल्यावर आपण तिच्यावर थंड पाणी शिंपडू शकता. यामुळे पाल घरातून पळून जाईल.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल