Join us  

घरात पाल दिसली की घाबरुन उड्या मारता? तुरटीचा १ सोपा उपाय, पाली ठोकतील धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2024 2:20 PM

How to get rid of house lizards without killing them : तुरटीचा एक खडा आणि पाली होतील गायब..

प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी पालींचा सुळसुळाट पाहायला मिळते (Lizard). घरातील भिंतीवर पाल दिसली तरी लहानांसोबतच मोठ्यांनाही भिती वाटते. पण घरातून पालीला पळवून लावणं कठीण वाटतं. कधी कधी तर पाल अंगावर पडेल या भीतीने आपण पाल कोणत्या दिशेने जाईल, तिच्यावर पाळत ठेऊन आपण बसतो. पाल फिरताना दिसली की किळस वाटते, मनात शंका येते की एखाद्या खाद्य पदार्थात पडून गेली तर? ज्यामुळे अन्नातून विषबाधा देखील होऊ शकते (Cleaning Tips). शिवाय आरोग्यही बिघडू शकते.

बाजारात पाल मारण्यासाठी अनेक विषारी लिक्विड उपलब्ध आहे. पण केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर न करता आपण तुरटीचा वापर करूनही पालीला पळवून लावू शकता. पण तुरटीचा वापर पालींना पळवून लावण्यासाठी कशापद्धतीने करता येईल? पाहूयात(How to get rid of house lizards without killing them).

पालींना पळवून लावण्यासाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्प्रे (How to get rid of lizards)

लागणारं साहित्य

मॉस्किटो कॉइल

तुरटी

साबुदाणा भिजल्यावर लगदा होतो? खिचडी कढईला चिकटते? ६ सोप्या टिप्स-खिचडी होईल परफेक्ट

मीठ

बेकिंग सोडा

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका खलबत्त्यात मॉस्किटो कॉइलचे तुकडे घाला. नंतर त्यात तुरटीचा खडा घालून बारीक पावडर तयार करा. एका भांड्यात एक ग्लास पाणी घाला. नंतर त्यात तयार तुरटी आणि मॉस्किटो कॉइलची पावडर, २ लाल सुक्या मिरच्या, एक चमचा मीठ आणि एक बेकिंग सोडा घालून मिक्स करा. ५ मिनिटांसाठी मध्यम आचेवर साहित्य उकळवून घ्या.

नारळाचं दूध काढायचं म्हणजे अवघड काम? फक्त १ युक्ती, थंडगार सोलकढी करा झटपट

पाणी थंड झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरा, व ज्या ठिकाणी पाली फिरतात त्या ठिकाणी हे पाणी शिंपडा. जर आपल्याला अचानक पाल दिसली तर, त्या पालीवर आपण हे पाणी शिंपडू शकता. पाण्याच्या उग्र गंधामुळे पाली घरात राहणार नाही. शिवाय पुन्हा घरात शिरणार नाही.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया