पावसाळा सुरु झाला की, घरभर माशा आणि चिलटं फिरु लागतात.(Monsoon Home cleaning tips) किचनमध्ये, हॉल किंवा बेडरुमध्ये माशांचा घोळका बसलेला दिसतो. या माशा चेहऱ्यावर-हातावर किंवा अन्नपदार्थांवर बसून त्रास देतात.(how to get rid of flies in monsoon) इतकेच नाही तर कधी कधी कानाजवळ भुणभुणतात. यामुळे आपल्याला अधिक वैताग येतो. अशावेळी आपण बाजारात मिळणाऱ्या महागड्या आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतो.(monsoon hygiene hacks) पण काहीही केले तरी माशा पुन्हा घरभर फिरतात. पण काही घरगुती उपाय केल्यास कीटकांपासून आपली सुटका होईल.(ingredients to add in floor cleaning water) पावसाळ्यात लादी पुसताना पाण्यामध्ये ३ पदार्थ घाला. ज्यामुळे माशा-कीटक तर घरातून पळून जातील तसेच दुर्गंधीसुद्धा येणारं नाही.
लादी पुसण्याचा मॉप काळाकुट्ट-मळकट झालाय? साफ करण्याची सोपी ट्रिक- घाणेरड्या वासापासूनही होईल सुटका
1. पावसाळ्यातील ओलाव्यामुळे जमिनीला बुरशी लागते.अशावेळी आपल्याला मीठ आणि बोरिंग पावडरचे मिश्रण तयार करुन पाण्यात मिसळून लादी पुसता येऊ शकते. इतकेच नाही तर आपल्याला स्वयंपाकघर, बाथरुम आणि पाणी साठणारी जागा नेहमी कोरडे ठेवायला हवी.
2. लिंबामध्ये सायट्रिक आम्ल आणि व्हिनेगरमध्ये अॅसिटिक आम्ल असते. हे दोन्ही घटक घरातील माशा किंवा किटके बाहेर काढण्यास मदत करतात. तसेच झुरळे आणि मुंग्यांना दूर ठेवतात. बादलीभर पाण्यामध्ये अर्धा कप लिंबाचा रस किंवा पांढरा व्हिनेगर मिसळा. या पाण्याने लादी पुसा. याच्या वासामुळे माशा घरात येणार नाही , तसेच फरशी देखील स्वच्छ राहिल.
3. कडुलिंब हे सर्वात प्रभावी औषध मानले जाते. तर बेकिंग सोडा ओलावा आणि गंध दूर करते. लादी पुसताना कडुलिंबाची पाने बारीक करुन त्याचा रस काढा किंवा २ चमचे कडुलिंबाची पावडर घ्या. त्यात चमचाभर बेकिंग सोडा घाला. हे मिश्रण फरशी पुसताना वापरा. असं रोज केल्यास माशा-चिलटे घरात येणार नाही.
4. लसणाचा वास हा कीटकांना आवडत नाही. लादी पुसताना २ ते ३ लसणाच्या पाकळ्या बारीक करुन त्याचा रस काढा. पाण्यात मिसळून फरशी पुसा. लसणामध्ये अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म आहेत. जे संसर्ग रोखण्यास मदत करतात.