Join us

घराच्या कानाकोपऱ्यातील झुरळांमुळे हैराण? करा १ घरगुती उपाय, झुरळं घरात फिरकणार देखील नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2025 19:01 IST

How To Get Rid Of Cockroaches Using Naphthalene Balls White Dambar Goli : Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently : Effective Ways to Get Rid of Cockroaches : घराच्या कानाकोपऱ्यात लपून बसलेली झुरळं नको जीव करतात, मग करा हा खास घरगुती उपाय...

घराच्या कानाकोपऱ्यांत सतत फिरणारी झुरळं पाहून नकोसे वाटते. घरांतील झुरळांचा वावर पाहून जीव नकोसा होतो. सतत इकडे - तिकडे फिरणारी झुरळं पाहून किळसवाणे वाटते. घरातील झुरळांना (How To Get Rid Of Cockroaches Using Naphthalene Balls White Dambar Goli) घराबाहेर घालवण्यासाठी आपण अनेक उपाय (Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently) करुन पाहतो. झुरळांना घालवण्यासाठी आपण महागडे, आणि हानिकारक केमिकल्सयुक्त स्प्रे, औषधं, गोळ्यांचा वापर करतो. परंतु या औषधांमधील हानिकारक केमिकल्स आणि रसायनं आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतात. या स्प्रे, औषधं, गोळ्यांच्या वासाने डोकेदुखी, श्वास घेण्यास अडथळा किंवा अशा अनेक लहान मोठ्या आरोग्याच्या समस्या त्रास देऊ शकतात( Effective Ways to Get Rid of Cockroaches).

यासाठीच, घरातील झुरळांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन झुरळांचा नायनाट करु शकतो. झुरळांचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण फार पूर्वीपासून डांबर गोळ्यांचा वापर करतोच. परंतु झुरळांसाठी फक्त डांबर गोळ्या वापरण्याऐवजी, याच गोळ्यांचा वापर करून  आपण एक घरगुती रामबाण उपाय करु शकतो. झुरळांना घालवण्यासाठी डांबर गोळ्यांचा नेमका वापर कसा करायचा ते पाहा.    

साहित्य :- 

१. डांबर गोळी - ६ ते ७ डांबर गोळ्या २. कॉफी पावडर - १  टेबलस्पून ३. बेकिंग सोडा -  १  टेबलस्पून ४. गव्हाचे पीठ - १  टेबलस्पून  ५. बोरिक पावडर -  २ टेबलस्पून  ६. पाणी - गरजेनुसार 

ब्रेडचा छोटा तुकडा करेल घराची स्वच्छता! ब्रेड शिल्लक राहिला, फेकू नका - घराचा कानाकोपरा दिसेल लख्ख...

पावसाळ्यात माशा, डास, कीटकांचा घरभर उच्छाद? पाहा प्लॅस्टिकची पिशवी व अ‍ॅल्युमिनियम फॉइलची सोपी व्हायरल ट्रिक...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये डांबर गोळ्या घेऊन त्याची बारीक पूड करून घ्यावी. २. या डांबर गोळीच्या बारीक पूडमध्ये कॉफी पावडर घालावी. आता सर्वातआधी डांबर गोळ्या पूड आणि कॉफी पावडर चांगली मिक्स करून घ्यावी. ३. आता या मिश्रणात बेकिंग सोडा, गव्हाचे पीठ, बोरिक पावडर घालावी. सगळे मिश्रण चमच्याने एकजीव करून घ्यावे. ४. सगळ्यात शेवटी या तयार मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यावी. 

प्रेशर कुकरचे रबर सैल झाले, वाफ बाहेर येते? सोपे ५ उपाय, एकदम चटकन करा दुरुस्त...

याचा वापर झुरळांना पळवून लावण्यासाठी कसा करावा? 

कणकेसारखे पीठ तयार झाल्यावर, या तयार पिठाचे छोटे - छोटे गोलाकार गोळे तयार करून घ्यावेत. हे तयार गोळे घराच्या कानाकोपऱ्यात, किचनमध्ये  किंवा जिथे जास्त प्रमाणात झुरळांचा वावर असेल त्या भागात ठेवून द्यावे. या उपायामुळे झुरळं गव्हाच्या पिठाच्या वासाने या मिश्रणाकडे आकर्षित होतील, आणि या मिश्रणातील विषारी घटकांमुळे जागीच मरुन पडतील. घरातील झुरळांना घालविण्याचा हा एक असरदार उपाय आहे. यात असणाऱ्या वेगवेगळ्या घटक पदार्थाच्या उग्र वासामुळे झुरळं घरातून लगेच बाहेर पळून जातात. अशा प्रकारे आपण घरातील झुरळांचे प्रमाण कमी करू शकतो.           

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी