Join us  

उन्हाळ्यात पालींचा सुळसुळाट- बारीक पिल्लं घरात दिसतात? बघा पाली घरातून गायब करण्याचा १ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 5:42 PM

Home Hacks To Get Rid of Lizards Or Chipkali: घरातलं टाकाऊ सामान वापरून पालींना पळवून लावणारं औषध घरच्याघरी कसं तयार करायचं बघा...

ठळक मुद्देहा उपाय करण्यासाठी आपल्याला अगदी घरातलेच पदार्थ वापरायचे आहेत. 

पालीला पाहिलं की अनेकजणी घाबरून ओरडतात. काही जणी तर ज्या खोलीत पाल दिसते, त्या खोलीत जाणंही टाळतात. वर्षभर पाली जरा कमी प्रमाणात दिसत असल्या तरी उन्हाळ्यात मात्र त्यांचा सगळीकडेच सुळसुळाट वाढतो. पालीची अगदी बारीक बारीक पिल्लंही घरात फिरताना दिसतात. पालीची भीती तर वाटतेच, पण ती अगदी स्वयंपाक घराच्या ओट्यापासून ते टॉयलेट- बाथरुमच्या भिंतींपर्यंत कुठेही दिसली तरी अगदीच किळसवाणी वाटते (how to get rid of chipkali?). म्हणूनच पालीला घरातून कायमसाठी हुसकून लावायचं असेल तर हे एक घरगुती औषध तयार करा (Home hacks to get rid of lizards). या औषधामुळे घरात असणाऱ्या पाली तर बाहेर पळून जातीलच, पण बाहेरूनही नव्याने कोणतीही पाल तुमच्या घरात येणार नाही. (useful tips and tricks to keep lizard or chipkali away from your house)

 

पालींना घरातून पळवून लावण्याचा घरगुती उपाय

पालींना घरातून पळवून लावण्यासाठी कोणता घरगुती उपाय करायचा, याविषयीचा एक छानसा व्हिडिओ Puneri tadka या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अगदी घरातलेच पदार्थ वापरायचे आहेत. 

 

सुटीत मुलं सतत टीव्ही- मोबाईल बघतात? ५ गोष्टी करा, चांगल्या सवयी लागतील- स्क्रिनपासून दूर होतील

त्यासाठी हिरव्या किंवा लाल मिरच्यांची ७ ते ८ देठं, तसेच लहान आकाराच्या २- ३ हिरव्या किंवा लाल मिरच्या, लसूणाची मुठभर टरफलं, एक ते दिड लिंबू आणि ४ ते ५ कापूर वड्या असं साहित्य लागणार आहे. 

 

सगळ्यात आधी तर एका पातेल्यामध्ये १ ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यात मिरच्यांची देठं, मिरच्यांचे तुकडे, लसणाची टरफलं आणि लिंबाच्या फोडी टाका. रस काढून घेतलेल्या लिंबाच्या फोडी असतील तरी चालतील.

 

त्यानंतर हे पाणी चांगलं तापवून ३ ते ४ मिनिटे उकळवून घ्या. त्यानंतर ते गाळून घ्या. या पाण्यात कापूर वड्यांची पावडर करून टाका आणि पाणी थंड झाल्यावर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

कडिपत्त्याच्या रोपावर पानांपेक्षा काड्याच जास्त? ३ गोष्टी करून पाहा, थोड्याच दिवसांत भरगच्च बहरेल

यानंतर हे पाणी घरात ज्या ठिकाणी पाल जास्त दिसते, त्या ठिकाणी शिंपडा. या वासामुळे पाली घरातून बाहेर पडतील. तसेच खिडक्यांच्या, दारांच्या चौकटीवरही हे पाणी शिंपडा. जेणेकरून तिथून एखादी बाहेरची पाल घरात येणार नाही, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडीकिचन टिप्सस्वच्छता टिप्स