Lokmat Sakhi >Social Viral > धान्याला लागणार नाही कीड- पडणार नाही अळ्या, वर्षभर टिकतील डाळ-तांदूळ - ३ उपाय

धान्याला लागणार नाही कीड- पडणार नाही अळ्या, वर्षभर टिकतील डाळ-तांदूळ - ३ उपाय

How to Prevent Bugs in Grains: How to get rid of bugs: steps to prevent stored grains: Effective Ways to Store grains: How to Clean grain from Pests: How to Get Rid of Bugs in legumes: DIY Solutions for Pantry Pests: धान्यांना कीड किंवा बुरशी लागू नये यासाठी स्वयंपाकघरातील तीन पदार्थ वापरु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2025 16:00 IST2025-02-24T15:58:01+5:302025-02-24T16:00:21+5:30

How to Prevent Bugs in Grains: How to get rid of bugs: steps to prevent stored grains: Effective Ways to Store grains: How to Clean grain from Pests: How to Get Rid of Bugs in legumes: DIY Solutions for Pantry Pests: धान्यांना कीड किंवा बुरशी लागू नये यासाठी स्वयंपाकघरातील तीन पदार्थ वापरु शकतो.

How to get rid of bugs rice legumes, split grains 3 home remedies steps to prevent stored grains | धान्याला लागणार नाही कीड- पडणार नाही अळ्या, वर्षभर टिकतील डाळ-तांदूळ - ३ उपाय

धान्याला लागणार नाही कीड- पडणार नाही अळ्या, वर्षभर टिकतील डाळ-तांदूळ - ३ उपाय

अनेक घरांमध्ये वर्षभरासाठी गहू-तांदूळ आणि इतर कडधान्य साठवून ठेवण्याची सवय आहे. (How to Prevent Bugs in Grains) ही साठवण उन्हाळ्याच्या काळात केली जाते. परंतु, धान्याची साठवण करताना अनेकदा मुंग्या, कीड किंवा बुरशी लागते. ज्यामुळे धान्य खराब होण्याची शक्यता निर्माण होते. अशावेळी धान्य साफ करण्याची वेळ आपल्यावर येते. (steps to prevent stored grains)
परंतु, धान्य साठवताना आपण योग्य काळजी घेतल्यास कीड किंवा बुरशी लागणार नाही. (Effective Ways to Store grains) धान्यांना कीड किंवा बुरशी लागू नये यासाठी स्वयंपाकघरातील तीन पदार्थ वापरु शकतो. या सोप्या टिप्समुळे धान्य वर्षभर नीट साठवता येईल. (How to Clean grain from Pests)

1. सिलिका जेल पॅकेट्स 
सिलिका जेल हे लहान कणांपासून बनलेले असते. जे ओलावा शोषून घेण्यास मदत करते. ओलाव्यामुळे तांदूळ, डाळी आणि पिठात कीटक तयार होतात. अशा वेळी तांदूळ किंवा डाळीच्या डब्यात सिलिका जेल पॅकेट्स ठेवल्याने ओलावा शोषला जाईल. हे पॅकेट आपल्याला प्रत्येक महिन्यात बदलावे लागेल. सिलिका जेलचे पॅकेट कापडात बांधून मगच धान्यात ठेवा. 

2. लवंग पावडर 
लवंगाचा तीव्र वास कीटकांना धान्यापासून दूर ठेवण्यास मदत करतो. यात असणारे घटक कीटक, किडे आणि अळ्यांना धान्याला चिकटू देत नाही. लवंगाच्या उग्रवासामुळे धान्याला कीड लागत नाही. त्यासाठी सुती कापडात १ ते २ चमचे लवंग पावडर घालून त्याची पुडी तयार करा. हे पॅकेट तांदूळ किंवा डाळ असलेल्या बॉक्समध्ये ठेवा. लवंगाचा वास तांदळातील कीटकांना दूर ठेवण्यास मदत करेल.

3. सुकवलेल्या कडुलिंबाची पाने 
मसुर डाळ आणि तांदळातील कीटक काढून टाकण्यासाठी सुकवलेल्या कडुलिंबाची पाने फायदेशीर आहे. याच्या तीव्र वासामुळे  धान्यातील कीटक बाहेर पडतात. यासाठी कडुलिंबाची ताजी पाने तांदळाच्या डब्यात ठेवा. कडुलिंबाच्या सुकलेल्या पानांचा देखील वापर करता येईल. ही पाने दर १५ ते २० दिवसांनी बदल राहा. ज्यामुळे धान्याला कीड लागणार नाही. 

Web Title: How to get rid of bugs rice legumes, split grains 3 home remedies steps to prevent stored grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.