Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोफा, गाद्या उशांमध्ये ढेकूण ? बाल्कनीतील २ रोपांची पाने करतील कमाल - ढेकूण होतील कायमचे गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2025 20:00 IST

How to Get Rid of Bed Bugs : get rid of bed bugs naturally : how to get rid of bed bugs permanently : घरातील ढेकणांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी महागडे उपाय नको, फक्त कुंडीतील २ रोपांची पाने आहेत असरदार...

घरातील गाद्या, उश्या, सोफ्याच्या फटी, भिंतींच्या कोपऱ्यांमध्ये किंवा लाकडी सामानावर ढेकूण झाले की सगळंच त्रासदायक होतं. घरातील वाढते ढेकूण आणि त्यांचा उच्छाद अनेकदा आपल्याला नकोसा वाटू लागतो. रात्री झोप लागत नाही, ढेकूण सतत शरीराचे चावे येतात, खाज सुटते आणि संपूर्ण घरात अस्वस्थता निर्माण होते. ढेकूण नष्ट करण्यासाठी बाजारात अनेक केमिकल स्प्रे, पेस्ट कंट्रोल उपलब्ध असले तरी त्यांचा तीव्र वास आणि साइड इफेक्ट्समुळे घरात ते वापरणे सुरक्षित नसते. घरात जर विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध असतील तर अशा केमिकल स्प्रे, पेस्ट कंट्रोलचा वापर करणे शक्यच होत नाही. ‘ढेकूण’ हे लहानसे कीटक दिसायला जरी इवलेसे वाटले तरी ते फारच त्रासदायक ठरतात. घरात एकदा ढेकूण झाले की ते जाता जात नाहीत उलट त्यांची वाढ दुप्पट वेगाने होते. वेळीच या कीटकांकडे काळजीपूर्वक लक्ष दिले नाही तर त्यांचा त्रास सहन करणे अशक्य होते(How to Get Rid of Bed Bugs).

खरं पाहायला गेल तर हा इतकासा जीव आपल्याला अगदी हैराण करून सोडतो. ढेकूण घालवण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध केमिकल स्प्रे, गोळ्या, औषध आणि शेवटचा उपाय म्हणून पेस्ट कंट्रोल करतो. परंतु काहीवेळा हे वेगवेगळे उपाय करूनही काहीच उपयोग होत नाही. यांसाठीच, घरगुती उपायांचा वापर करून ढेकूण दूर करणे हे अधिक नैसर्गिक, कमी खर्चिक (get rid of bed bugs naturally) आणि सुरक्षित पर्याय ठरतो. घरातील ढेकूण घालवण्याच्या सोपा (Bed bug removal at home) आणि कमी खर्चिक पण असरदार असा उपाय नेमका कोणता ते पाहूयात(how to get rid of bed bugs permanently).

ढेकूण घालवण्याचा सोपा घरगुती असरदार उपाय... 

१. मोरपंखी रोपाचा नैसर्गिक घरगुती उपाय :- मोरपंखी रोपांच्या पानांमध्ये एक तिखट आणि तीव्र वास असतो. ढेकूण आणि इतर कीटक या रोपाच्या पानांचा  तीव्र वास सहन करू शकत नाहीत. मोरपंखीच्या पानांचा तीव्र, नैसर्गिक वास ढेकणांच्या नैसर्गिक श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण करतो आणि त्यांना त्या जागेवरून दूर पळून जाण्यास भाग पाडतो, असे मानले जाते. मोरपंखीच्या झाडावरून ताज्या पानांच्या छोट्या फांद्या तोडून घ्या. हा पाला थेट अशा ठिकाणी ठेवा जिथे ढेकूण लपलेले असतात, हा पाला 'ढेकणांच्या लपण्याच्या ठिकाणी' ठेवल्यामुळे वासाचा परिणाम जास्त होतो. यामुळे ढेकूण लपण्याच्या जागेतून बाहेर येतात किंवा त्या तीव्र वासामुळे दम गुदमरून मरतात.

ओघळलेले स्तन सुडौल होण्यासाठी घरीच करा ३ सोपे व्यायाम ! परफेक्ट फिगर दिसेल सुंदर...

२. कडुलिंबाच्या पानांचा नैसर्गिक घरगुती उपाय :- मोरपंखीच्या पानांव्यतिरिक्त, कडुलिंबाची पाने आणि पुदिन्याची पाने देखील ढेकणांना पळवून लावण्यासाठी पारंपरिकरित्या वापरली जातात. या सर्व वनस्पतींमध्ये असलेले नैसर्गिक तेल कीटकांना हानिकारक असते. पुदिना आणि कडुलिंब या दोन्ही पानांच्या तीव्र वासामुळे ढेकणांसाठी विषारी मानले जाते.

महागडे कुमकुमादी तेल करा घरीच! हिवाळ्यात त्वचेसाठी अमृतासमान - चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या होतील गायब... 

याचबरोबर लक्षात ठेवा... 

१. ढेकणांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काही दिवसा गाद्या, अंथरूण आणि सर्व कपडे कडक उन्हात वाळत ठेवावेत. कारण तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे ढेकूण पळून जातात.

२. ज्या भागात ढेकूण अति जास्त प्रमाणात असतील, तिथे गरम पाण्याची फवारणी करावी. ही उष्णता त्यांना सहन होत नाही आणि ते नष्ट होतात.

३. कपडे, चादरी आणि बेडशीट्स गरम पाण्याने धुणे फायदेशीर ठरते. यामुळे फक्त ढेकूणच नाही, तर ज्यामुळे होणाऱ्या संसर्गाचाही धोका कमी होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Get rid of bed bugs with these two balcony plants!

Web Summary : Bed bugs in mattresses and sofas are a common nuisance. Morpankhi and neem leaves offer natural solutions. Their strong scents repel bed bugs, providing a safe alternative to chemical sprays. Regular sun exposure and hot water washing also help eliminate these pests.
टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडी