पावसाळ्यात सगळीकडेच दमट हवामान असते. त्यात जर काही दिवस सतत पाऊस चालू राहिला तर सगळ्यात जास्त अडचण येते ती कपडे कुठे वाळत घालावे याची. पाऊस चालू असल्याने बाहेर मोकळ्या हवेत कपडे वाळत घालता येत नाहीत. त्यामुळे मग ते आपण घरातच कुठेतरी वाळत घालतो. यामुळे कपडे छान कडक वाळत नाहीत. त्यांच्यामध्ये थोडासा आंबट ओलेपणा असतोच.. ते कपडे जर तसेच घडी घालून ठेवले गेले तर मग त्या कपड्यांना कुबट वास येऊ लागतो. कपडे अगदी स्वच्छ धुतलेले असतील तरीही तो वास येतोच आणि मग स्वच्छ कपडाही अगदीच अस्वच्छ वाटू लागतो. त्यामुळेच या दिवसांत कपड्यांना येणारा कुबट वास कसा घालवायचा हा प्रश्न अनेकांना पडतो.. त्यासाठीच या काही खास टिप्स पाहा..(how to get rid of bad smell from clothes in monsoon or rainy days?)
पावसाळ्यात कपड्यांना येणारी दुर्गंधी कशी घालवायची?
१. एका बादलीमध्ये थोडं गरम पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा, २ चमचे व्हिनेगर आणि १ चमचा मीठ घाला. मीठ आणि सोडा पाण्यामध्ये पुर्णपणे विरघळल्यानंतर त्यामध्ये कुबट वास येणारे कपडे भिजत घाला. अर्ध्या तासानंतर ते कपडे घट्ट पिळून वाळत घाला. कपड्यांची दुर्गंधी जाईल.
अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी- चाखून बघताच म्हणाल बल्ले बल्ले! फक्त १५ मिनिटांत होणारी खास रेसिपी
२. दुसरा उपाय म्हणजे उदबत्ती, धूप यांची रिकामी पाकिटं तुमच्या कपाटात कपड्यांच्या जवळ ठेवा. पण त्या पाकिटांचा स्पर्श कपड्यांना होणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर कपड्यांना डाग पडू शकतो.
३. कपाटामध्ये डांबर गोळ्या किंवा कापूर यांची पुरचुंडी करून ठेवल्यानेही पावसाळ्याच्या दिवसांत कपड्यांना येणारी दुर्गंधी टाळता येते.
रविना टंडनच्या दाट केसांचं सिक्रेट आहे आवळा- दुधाचा हेअरमास्क! बघा कसा तयार करायचा...
४. पावसाळ्यात शक्यतो जाड कपडे धुणे टाळावे. किंवा धुवायचेच असतील तर वातावरणाचा एकदा अंदाज घेऊन मगच धुवावे.