Join us

प्लास्टिकच्या बादल्या-मग-आंघोळीचे पाट तुटले? १ इन्स्टंट ट्रिक - तुटलेले प्लास्टिकही चिकटेल मस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 12:35 IST

how to fix broken plastic bucket : DIY trick to repair broken plastic mug : easy way to stick cracked plastic balti : home remedy to fix plastic household items : how to repair cracked plastic at home : रोजच्या वापरातील प्लास्टिकच्या तुटलेल्या वस्तूंना पुन्हा जोडता आलं तर ? यावरचा उपाय म्हणून ही भन्नाट ट्रिक...

आपण रोजच्या वापरात बऱ्याच प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करतो. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरात आपण एक ना अनेक अशा असंख्य प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर हमखास करतो. प्लास्टिकच्या वस्तू या हलक्या, वापरायला सोयीस्कर आणि खूप उपयोगी पडतात. आपल्या सगळ्यांच्याच घरात (how to fix broken plastic bucket) अंघोळीसाठी प्लास्टिकच्या बादल्या, मग तसेच अंघोळीला बसायचे टेबल किंवा पाट (trick to repair broken plastic mug) अशा भरपूर प्लास्टिकच्या वस्तू असतात. या वस्तू रोजच्या वापरातील असल्याने त्यांचा वापर हमखास केलाच जातो. या प्लास्टिकच्या वस्तू सतत वापरुन काहीवेळा अचानक तुटतात किंवा त्याला तडे जातात(home remedy to fix plastic household items).

प्लास्टिकच्या वस्तू जोरात आदळल्या, वजन जास्त पडले किंवा उष्णतेमुळे त्यांना तडे जातात, तुकडे पडतात. प्लास्टिकच्या अशा नेहमीच्या वापरातील वस्तू तुटल्या किंवा त्याला तडे गेले तर आपण त्या चक्क फेकून देतो. आपल्या रोजच्या वापरातील प्लास्टिकच्या तुटलेल्या वस्तूंना पुन्हा जोडता आलं तर ? यावरचा उपाय म्हणून एक भन्नाट ट्रिक आहे. या ट्रिकचा वापर करून आपण तुटलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंना पुन्हा जोडून आधीपेक्षा अधिक मजबूत करू शकतो, ज्यामुळे त्या दीर्घकाळ सहज टिकतील. प्लास्टिकच्या (how to repair cracked plastic at home) तुटलेल्या  वस्तू दुरुस्त करण्याची ही सोपी आणि इन्स्टंट पद्धत नेमकी कोणती ते पाहूयात... 

प्लास्टिकच्या तुटलेल्या वस्तुंना पुन्हा चिटकवण्याची सोपी युक्ती... 

नेहमीच्या वापरातील प्लास्टिकच्या अनेक वस्तू तुटल्या की आपण त्या सरळ फेकून देतो. पण खरंतर, या वस्तू पुन्हा चिटकवून वापरता येतात. एक भन्नाट ट्रिक वापरली, तर या प्लास्टिकच्या वस्तू अगदी घट्ट चिटकतात आणि पुन्हा तुटत नाही. मग पाहूयात ही सोपी आणि उपयोगी ट्रिक नेमकी कोणती... प्लास्टिकच्या तुटलेल्या वस्तूंना पुन्हा चिटकवण्याची सोपी ट्रिक homecheff_renu या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. 

गॅस बर्नर स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक! गॅस लवकर संपणार नाही, इतका सोपा उपाय...

घरच्याघरीच प्लास्टिकच्या तुटलेल्या वस्तू चिटकवण्यासाठी आपल्याला चमचाभर बेकिंग सोडा आणि फेविक्विक इतक्या दोन गोष्टींची गरज लागणार आहे. सगळ्यात आधी प्लास्टिकच्या वस्तूचा जो भाग तुटला आहे त्या भागावर बेकिंग सोडा हलकेच घालावा. मग  त्यावर फेविक्विक व्यवस्थित पसरवून लावावे. १० ते २० मिनिटे ते तसेच सुकण्यासाठी ठेवून द्यावे. त्यानंतर आपण पाहू शकता की, प्लास्टिकच्या वस्तूचा तुटलेला भाग पूर्णपणे चिकटलेला असेल. या उपायामुळे प्लस्टिकच्या वस्तूचा तुटलेला भाग चिकटून वस्तू आधीपेक्षा अधिक मजबूत झालेली दिसेल. जर तुमच्या सुद्धा घरातील एखादी प्लास्टिकची वस्तू तुटलेली असेल तर ती फेकण्याआधी हा घरगुती उपाय नक्की ट्राय करुन पाहा... 

गणेशोत्सवापूर्वी घरातील लाकडी फर्निचर चमकवण्याची भन्नाट १ ट्रिक, वॉर्निश-प्रायमरची गरजच नाही...

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडी