एरवी आपण अगदी सोपी, लहानशी आणि चटकन होईल अशी रांगोळी दारापुढे काढत असतो. पण सणावाराचे दिवस आले आणि त्यातही वर्षाचा मोठा दिवाळसण असेल तर मग आपण मस्त मोठी रांगोळी काढून आपलं अंगण किंवा घरासमोरची जागा सुशोभित करतो. आता अशी मोठी रांगोळी काढायची असेल तर ५ बोटांची रांगोळी हा एक उत्तम पर्याय आहे. पण बऱ्याच जणींना ५ बोटांची रांगोळी व्यवस्थित काढताच येत नाही. कधी रांगोळीची रेघ खूपच वाकडी- तिकडी येते तर कधी कुठे रांगोळी कमी पडते तर कधी खूपच जास्त पडते (how to draw modern art rangoli designs?). म्हणूनच ५ बोटांची रांगोळी काढताना आपल्या बोटांची रचना नेमकी कशी असावी आणि रांगोळी काढताना इतर कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या, याविषयीची ही खास माहिती...(how to draw Free Hand Rangoli?)
५ बोटांची रांगोळी कशी काढावी?
नावावरूनच लक्षात येत आहे की ५ बोटांची रांगोळी काढण्यासाठी आपल्या हाताच्या पाचही बोटांचा योग्य पद्धतीने उपयोग करूनच आपल्याला रांगोळी काढायची आहे.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी परफेक्ट नाश्ता कोणता? घ्या यादी- शुगर, वजन दोन्हीही राहील कंट्रोलमध्ये
त्यासाठी मधले बोट आणि त्याच्या बाजुचे अंगठी घालण्याचे बोट हे सगळ्यात आधी जोडून घ्या. ही दोन्ही बोटे जणू काही बेसप्रमाणे काम करणार आहेत.
आता पहिले बोट म्हणजेच तर्जनी मधल्या बोटाला अगदी जोडून घ्या. तर्जनीचा काही भाग मधल्या बोटावर येऊ द्या. त्याच पद्धतीने करंगळी अनामिकेवर येऊ द्या. आता चारही बोटांमध्ये जेवढी मावेल तेवढीच रांगोळी घ्या. यानंतर करंगळी आणि तर्जनी यांच्यामध्ये अंगठा ठेवा.
कांदा- कोथिंबीर पराठा! शाळेचा डबा, नाश्त्यासाठी झटपट होणारा चविष्ट पदार्थ- घ्या सोपी रेसिपी
आता हळूहळू रांगोळी सोडा. जेव्हा तुम्हाला रांगोळी पडणं थांबवायचं असेल तेव्हा अंगठ्याच्या पुढच्या भागाने दाब देऊन रांगोळीचा फ्लो थांबवा. ५ बोटांची रांगोळी काढण्यासाठी नेहमी जाडसर रांगोळीच वापरावी. या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हालाही ५ बोटांची रांगोळी अगदी सुरेख काढता येईल.