आता अवघ्या काही दिवसांत घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि त्यांच्या पाठोपाठ लगेचच गौराईही येणार आहेत. आता हे दोन्ही सण म्हणजे घरातल्या महिलांच्या मागे प्रचंड धावपळ. यात गणपती, गौराई यांच्यासाठीची सजावट, आरास घरातले इतर सदस्य करतात. पण गौरींना किंवा ज्येष्ठा- कनिष्ठांना साडी नेसविण्याचे काम मात्र घरातल्या स्त्रियांनाच करावे लागते. हे काम बरेच वेळखाऊ असते कारण साड्या अजिबातच चापूनचोपून बसत नाहीत. त्यामुळे साड्या नेसवायला मग खूप वेळ लागतो. तुमचं हे काम सोपं करायचं असेल तर त्यासाठी साड्यांची निवड योग्य पद्धतीने व्हायला हवी (how to choose perfect saree for gauri or mahalaxmi?). त्यासाठी नेमक्या कशा साड्या घ्यायच्या ते पाहूया..(how to drape saree to jyeshtha and kanishtha?)
ज्येष्ठा- कनिष्ठांना नेसविण्यासाठी साड्यांची निवड कशी करावी?
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साड्या नेसवताना त्या खूप सुळसुळीत प्रकारातल्या घेऊ नका. सिल्कच्या काही साड्याही अतिशय सुळसुळीत असतात. या साड्यांना व्यवस्थित पिनअप करून त्या चापून चोपून बसवता येत नाहीत. त्यामुळे गौरींसाठी सुळसुळीत साड्या घेणे टाळा.
अख्खा मसूर जितका भारी तसाच चविष्ट मसूर पुलाव! पावसाळ्यात तर खायलाच हवा झणझणीत मसूर पुलाव
२. खूप मोठे काठ असणाऱ्या साड्या नेसविणेही टाळायला हवे. कारण गौरींची मुर्ती उंचीने कमी असते. साड्या जर मोठ्या काठांच्या असतील तर पदराच्या निऱ्या घालायला अवघड जातं. साडीपेक्षा गौंरींच्या अंगावर साडीचे काठच जास्त चमकू लागतात.
३. काठांचा आकार मध्यम आहे, पण जर ते खूप कडक, जड असतील तर अशी साडीही घेऊ नका. कारण असे कडक काठ निऱ्यांमध्ये खाेचल्यावर गौरींची साडी जास्त फुगल्यासारखी दिसते.
शिवाय कडक, जड काठ असतील तर ते डोक्यावर तसेच खांद्यावरही व्यवस्थित बसत नाहीत.
४. जी साडी वजनाने हलकी असते अशी साडी गौरींना नेसविण्यासाठी जास्त उत्तम. त्यामुळे साडी घेण्याच्या आधी तिचे वजन नक्कीच तपासून पाहा.