Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > पपई चिरण्याची भन्नाट युक्ती, १ स्टिलचा डबा-१ सुरी एवढं फक्त घ्या- बघा झटपट काम

पपई चिरण्याची भन्नाट युक्ती, १ स्टिलचा डबा-१ सुरी एवढं फक्त घ्या- बघा झटपट काम

how to cut papaya: papaya cutting trick: kitchen hacks: easy fruit cutting tips: ही ट्रिक पाहिल्यानंतर आपण जुन्या पद्धतीने पपई कापणे कायमचे विसरून जाल. जाणून घेऊया नक्की काय आहे ही भन्नाट पद्धत आणि ती कशी काम करते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2026 13:09 IST2026-02-20T12:50:26+5:302026-02-20T13:09:29+5:30

how to cut papaya: papaya cutting trick: kitchen hacks: easy fruit cutting tips: ही ट्रिक पाहिल्यानंतर आपण जुन्या पद्धतीने पपई कापणे कायमचे विसरून जाल. जाणून घेऊया नक्की काय आहे ही भन्नाट पद्धत आणि ती कशी काम करते.

how to cut papaya easily at Home simple trick to cut papaya without mess best way to remove papaya seeds quickly easy papaya cutting hack using steel container step by step papaya cutting method | पपई चिरण्याची भन्नाट युक्ती, १ स्टिलचा डबा-१ सुरी एवढं फक्त घ्या- बघा झटपट काम

पपई चिरण्याची भन्नाट युक्ती, १ स्टिलचा डबा-१ सुरी एवढं फक्त घ्या- बघा झटपट काम

ऋतू बदलला की बाजारात विविध प्रकारच्या फळांची चव चाखायला मिळते. उन्हाळा सुरु झाला की आपल्याला बाजारात पपई पाहायला मिळते. बाजारात फळं पाहिली की पिवळी, चमकदार पपई लगेच डोळ्यात भरते.(Papaya ripening) पण दिसायला सुंदर असणारी पपई नेहमीच गोड किंवा चांगली असेल असे नाही. अनेकदा पपई कापताना आधी ती सोला, मग मधल्या चिवट बिया काढा, त्यात हात चिकट होतात आणि पपईचा रस सगळीकडे पसरतो. अनेकदा तर बिया काढण्याच्या नादात पपईचा बराचसा गर वाया जातो. पण जर आपल्याला पपई सोलायची गरज पडली नाही आणि बिया काढण्यासाठी चमच्याचा वापरही करावा लागला नाही तर?

कोबीच्या पानांची भाजी नाही भजी करा, चमचमीत- कुरकुरीत पदार्थ; मिरची भजीपेक्षा भारी चव, पाहा रेसिपी

सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये फक्त एक साधा चाकू आणि स्टीलचा गोल डबा वापरून पपईचे काप अगदी काही सेकंदात काढले जातील. या पद्धतीत पपई कापल्यास बिया काढण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागणार नाही आणि पपईचा आकारही अगदी परफेक्ट येईल. ही ट्रिक पाहिल्यानंतर आपण जुन्या पद्धतीने पपई कापणे कायमचे विसरून जाल. जाणून घेऊया नक्की काय आहे ही भन्नाट पद्धत आणि ती कशी काम करते. 

सगळ्यात आधी आपल्याला पपई चाकूने गोलाकारात कापावी लागेल. पपई खूप मोठी असेल तर तिचे सहा तुकडे करु शकता. किंवा त्याचे चार तुकडे पुरेसे असतात. पपई वर्तुळाकार कापल्यानंतर, गोल डबा घ्या आणि तो पपईच्या वर ठेवा आणि खाली दाबा. यामुळे सगळ्यात आधी पपई त्याच्या सालीपासून वेगळी होईल.

यानंतर बिया त्यातून सहज बाहेर येतील. आपल्याला हवं असल्यास आपण पूर्ण गोल पपई खाऊ शकतो. पपई ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पण ती कापण्याच्या कंटाळ्यामुळे अनेकजण पपई आणणे टाळतात. सध्या या  व्हायरल ट्रिकमुळे आपलं काम सोपे होणार आहे. आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकाला 'स्मार्ट वर्क' आवडते. 


Web Title : पपीता काटने का अनोखा तरीका: स्टील का डिब्बा और चाकू इस्तेमाल करें!

Web Summary : पपीता काटने से परेशान? यह वायरल तरीका स्टील के डिब्बे और चाकू का उपयोग करके जल्दी और साफ स्लाइस बनाता है, जिससे फल आसानी से त्वचा और बीजों से अलग हो जाता है। आसानी से पपीते का आनंद लें!

Web Title : Innovative papaya cutting trick: Use a steel container and knife!

Web Summary : Tired of messy papaya cutting? This viral trick uses a steel container and knife for quick, clean slices, easily separating the fruit from the skin and seeds. Enjoy papaya effortlessly!