Join us

भेंडी चिरण्याचं काम मोठं चिकट आणि किचकट! पाहा झटपट भेंडी चिरण्याची ‘ही’ सोपी ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2025 16:35 IST

Easy trick to cut bhindi : How to chop okra without stickiness: Bhindi cutting hacks : भेंडीची भाजी खायला आवडत असेल पण चिरण्याचा कंटाळा येत असेल तर ही सोपी ट्रिक वापरा.

भेंडीची भाजी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकजण आवडीने खातात.(Easy trick to cut bhindi ) भाजी व्यतिरिक्त आपण त्याचे विविध पदार्थ देखील बनवून खातो.(How to chop okra without stickiness) भरली भेंडी, मसाला भेंडी, रस्सा भेंडी असे अनेक प्रकार बनवतो.(Okra chopping tricks) भेंडीची भाजी ही चिरताना हात चिकट आणि बुळबुळीत होतात. कितीही मसाला घातला तरी ती तिखट होत नाही.(Kitchen tips for bhindi) भेंडीपासून विविध पदार्थ बनवता येतात पण ती कापायला आणि धुवायला खूप वेळ लागतो. (Ladyfinger cutting tips)जर तुम्हालाही भेंडीची भाजी खायला आवडत असेल पण चिरण्याचा कंटाळा येत असेल तर काळजी करु नका.(kitchen hacks) प्रसिद्ध ब्लॉगरने भेंडी कापण्याची नवीन ट्रिक सांगितली. ज्याच्या मदतीने तुम्ही एका मिनिटात भेंडी कापू शकता. यामुळे आपला वेळही वाचेल आणि पटकन चिरुन होईल. (Easy step-by-step trick to cut bhindi)

पोळा स्पेशल : परफेक्ट पुरण करण्यासाठी ५ टिप्स, पुरणपोळी होईल मऊ लुसलुशीत - टम्म फुगेल

सगळ्यात आधी आपल्या भेंडी पूर्णपणे धुवून स्वच्छ कापडाने पुसून पूर्णपणे वाळवून घ्यायला हवी. भेंडीमध्ये पाणी नसायला हवे, नाहीतर भाजी चिकट होते. आपण भेंडी धुतल्यानंतर काही वेळ कापडात पसरवून फॅनखाली सुकत घाला. यानंतर सगळ्या भेंडी एकावर एक रचून ठेवा. देठ आणि भेंडीचे टोक असे एकावर एक ठेवता येतील. आता देठाच्या बाजूला रबर बँड लावा. 

भेंडीला रबर बँड बांधल्यामुळे ती सहज चिरायला मदत होईल. भेंडीच्या देठाला बाजूने धरा आणि चाकूच्या मदतीने शेपटीच्या बाजूने हळूहळू कापायला सुरुवात करा. यामुळे एकाच वेळी अनेक भेंडी सहज कापल्या जातील. खरंतर भेंडी कापण्यासाठी आपल्याला १० ते १५ मिनिटे लागतात. पण ही सोपी ट्रिक वापरली तर तुमचा वेळ वाचेल. तसेच हात देखील चिकट होणार नाही.