Join us

मुलांच्या शाळेच्या पांढऱ्याशुभ्र बुटांवर चिखलाचे काळेकुट्ट डाग पडलेत? ३ उपाय- न धुता बूट होतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2025 20:03 IST

Cleaning Tips: मुलांच्या शाळेचे पांढरे बूट न धुताही स्वच्छ करण्याची ही सोपी ट्रिक एकदा करून बघाच..(how to clean white shoes of kids?) 

ठळक मुद्देन धुताही कळकट्ट झालेले पांढरे बूट पुन्हा एकदा कसे स्वच्छ करायचे ते पाहा..

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे मग सगळीकडे चिखल असतोच. हल्ली बहुतांश मुलांना शाळेसाठी पांढरे बूटही असतातच. आठवड्यातून दोन दिवस त्यांना ते घालावे लागतात. त्याच दिवसांमध्ये काही जणांचा खेळाचा तासही असतो. अशावेळी मैदानात जाणं होतं. सध्या तर पावसामुळे मैदानावरही चिखल झालेला असतो. अशावेळी मुलांचे पांढरेशुभ्र बूट चिखल लागून हमखास खराब होतात (simple tricks and tips to clean white shoes). ते धुणं दरवेळी शक्य नसतं. कारण एकतर वेळ नसतो किंवा ते बूट वाळण्यासाठी पुरेसं ऊन नसतं. म्हणूनच न धुताही कळकट्ट झालेले पांढरे बूट पुन्हा एकदा कसे स्वच्छ करायचे ते पाहा..(how to clean white shoes of kids?)

मुलांच्या शाळेचे पांढरे बूट कसे स्वच्छ करावे?

 

१. बेकिंग सोडा

पांढऱ्या बुटांचा मळकटपणा घालविण्यासाठी बेकिंग सोडा अतिशय उपयुक्त ठरू शकतो. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस पिळा.

भारताच्या 'या' शहरात राहतात सगळ्यात जास्त लठ्ठ लोक! बघा तुम्ही तर त्या शहरात नाही ना?

आता ही पेस्ट तुमच्या बुटांना लावून ठेवा. त्यानंतर साधारण ४ ते ५ मिनिटांनी एक खराब टुथब्रश घ्या आणि बुटांवरचे डाग घासून काढा. त्यानंतर ओल्या कपड्याने बूट पुसून घेतल्यानंतर ते अगदी स्वच्छ झालेले दिसतील.  

 

२. टुथपेस्ट

टुथपेस्ट वापरूनही काळवंडलेले बूट अगदी नव्यासारखे स्वच्छ करता येतात. हा उपाय करण्यासाठी एक खराब टुथब्रशही लागणार आहे. सगळ्यात आधी तर ब्रश आणि बूट थोडे ओलसर करून घ्या.

पालकाच्या भाजीमध्ये 'हा' पदार्थ मुळीच घालू नका! किडनीस्टोन असणाऱ्यांनी तर हमखास टाळावाच..

त्यानंतर ब्रशवर टुथपेस्ट लावा आणि बूट घासून काढा. ते अगदी नव्यासारखे स्वच्छ होतील.

३. बेबी वाईप्स

बाळांना पुसण्यासाठी बेबी वाईप्स असतात. त्या वाईप्स जर तुमच्या घरात असतील तर त्यांचा वापर करूनही काळवंडलेले बूट स्वच्छ करता येतात. जर डाग ओलसर असतील तर बेबी वाईप्सने ते अगदी पटकन निघून जातात. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी