Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीत 'या' झाडाची लहानशी फांदी घाला, दुर्गंधी येणार नाही-शेवाळं साचणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2026 16:32 IST

how to clean water tank using jamun wood at home : home remedies for water tank cleaning : how to use jamun branch to purify water tank : रुपयाही खर्च न करता पाण्याची टाकी ठेवा चकाचक; वर्षानुवर्षे केला जाणारा पारंपरिक उपाय...

घरात पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या टाकीचा नियमित वापर होत असताना त्यात शेवाळ साचणं, घाण जमा होणं किंवा पाणी दूषित होणं ही एक फारच कॉमन समस्या आहे. सूर्यप्रकाश आणि ओलावा यामुळे टाकीच्या आतील थरावर हिरवट रंगाचे शेवाळ तयार होते. हे शेवाळ केवळ टाकीला घाण करत नाही, तर यामुळे पाण्याला दुर्गंधी येते आणि ते पिण्यासाठी किंवा वापरासाठी दूषित होते. अशा टाकीतलं दूषित झालेलं पाणी आरोग्यासाठी घातक ठरू शकतं, त्यामुळे वेळोवेळी टाकीची स्वच्छता आणि देखभाल करणं अत्यंत महत्त्वाचं ठरते. प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीतील शेवाळ आणि घाण साफ करणं मोठी डोकेदुखीच असते(how to clean water tank using jamun wood at home).

प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीतील शेवाळ आणि घाण साफ करण्यासाठी (how to use jamun branch to purify water tank) नेहमी केमिकल्स वापरण्यापेक्षा काही सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय करूनही टाकी स्वच्छ ठेवता येते. अनेकदा आपण टाकी साफ करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतो किंवा केमिकल्सचा वापर करतो, पण काही दिवसांतच परिस्थिती जशीच्या तशी होते...अशावेळी एक साधासुधा घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतो, अत्यंत कमी खर्चात प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीतील शेवाळ आणि घाण साफ करण्यासाठी घरगुती उपाय (home remedies for water tank cleaning) नेमका काय आहेत ते पाहूयात. 

जांभळाच्या फांदीचा उपाय कसा करायचा?

पाण्याच्या टाकीतील शेवाळ नैसर्गिकरित्या रोखण्यासाठी जांभळाच्या झाडाचा वापर फायदेशीर ठरु शकतो. जांभळाच्या झाडाची एक मध्यम आकाराची (साधारण १ ते २ फूट) ताजी फांदी तोडून आणा. फांदी खूप जुनी किंवा वाळलेली नसावी. ही फांदी टाकीत टाकण्यापूर्वी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, जेणेकरून त्यावर असलेली धूळ किंवा कीड निघून जाईल. फांदीला असलेली पाने काढली तरी चालतील, फक्त लाकडी फांदी महत्त्वाची आहे. स्वच्छ केलेली ही फांदी थेट पाण्याच्या टाकीत टाकून द्या. ही फांदी टाकीच्या तळाला जाऊन बसते. साधारण ६ महिने ते १ वर्ष ही फांदी टाकीत ठेवता येते. त्यानंतर ती कुजण्यापूर्वी काढून दुसरी ताजी फांदी टाकावी.

मनानं स्ट्रॉंग व्हायचं असेल तर ७ गोष्टी करा, कुठल्याही परिस्थितीचा सामना कराल हसत हसत...

जांभळाची फांदीच का?

जांभळाच्या लाकडामध्ये विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक गुणधर्म असतात जे पाण्यात 'अँटी-बॅक्टेरियल' आणि 'अँटी-फंगल' एजंट म्हणून काम करतात. जांभळाचे लाकूड पाण्यात लवकर कुजत नाही. हे लाकूड पाण्यात राहिल्यामुळे पाण्याची शुद्धता टिकून राहते आणि भिंतीवर शेवाळ धरण्याची प्रक्रिया मंदावते. जांभळाच्या झाडाच्या फांदीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे पाण्यातील जंतूंची वाढ कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे पाणी अधिक स्वच्छ आणि सुरक्षित राहू शकतं.

मुलांच्या पोटात जंत झाले आहेत हे सांगणारी ९ लक्षणं! मुलं पोटदुखीने पडतील आजारी-वाढ खुंटेल...

इतर महत्त्वाचे उपाय... 

टाकी महिन्यातून किमान एकदा स्वच्छ पाण्याने आणि ब्रशने घासून स्वच्छ करा. टाकीवर झाकण व्यवस्थित ठेवा, जेणेकरून धूळ किंवा कीटक आत जाणार नाहीत. शक्य असल्यास टाकी थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा, कारण उष्णतेमुळे शेवाळ लवकर वाढतं.

काही गोष्टी लक्षात ठेवा... 

जांभळाची फांदी वापरताना ती स्वच्छ आणि ताजी असावी. खूप जुनी किंवा कुजलेली फांदी वापरू नये. तसेच हा उपाय पूरक आहे, त्यामुळे नियमित स्वच्छता करणेही तितकेच गरजेचे आहे. नैसर्गिक आणि सोप्या उपायांनी पाण्याची टाकी स्वच्छ ठेवता येते. जांभळाच्या फांदीचा हा उपाय करून तुम्ही पाणी अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Clean water tank naturally: Use Jamun branch for freshness.

Web Summary : Plastic water tanks often accumulate algae and impurities. Using a Jamun branch is a natural solution. It possesses antibacterial and antifungal properties that purify water, prevent algae growth, and keep the tank clean for months. Regular cleaning is still advised.
टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी