आपले टॉयलेट स्वच्छ असेल तर आपण निरोगी असतो असं म्हटलं जाते. आपले संपूर्ण घर स्वच्छ आणि सुंदर आहे की नाही हे टॉयलेटवरुन कळते. (Homemade toilet cleaner) आठवडाभर टॉयलेट साफ केले नाही तर त्यावर पिवळे-काळे डाग साचतात, दुर्गंधी येऊ लागते.(Remove toilet odor naturally) अशावेळी टॉयलेट साफ करणं आपल्या नाकीनऊ येते.(Natural way to clean toilet) कारण कितीही ब्रशने घासले तरी पिवळे हट्टी डाग जात नाही. त्यासाठी टॉयलेट वेळीच साफ करायला हवं. (How to clean toilet without brush)
टॉयलेटचा दुर्गंध इतका येतो की, आपल्याला सहन होत नाही. त्यामुळे पुन्हा तिथे जाण्याची इच्छा देखील होत नाही. या घाणीमुळे आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकते.(Baking soda toilet cleaner) ज्याचे संक्रमण वाढल्यास अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. पण सोप्या पद्धतीने आपण टॉयलेट साफ करु शकतो. ज्यामुळे दुर्गंधी देखील येणार नाही. (No brush toilet cleaning method)
टॉयलेट साफ करण्यासाठी आपल्याला ॲल्युमिनियम फॉइल पेपरचा एक बॉल बनवावा लागेल. यासाठी साबण किसून त्यात टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा घालून चांगले मिसळा. या पद्धतीने आपला क्लिनर तयार होईल. क्लिनरचा एक छोटा गोळा बनवून फॉइल पेपरमध्ये गुंडाळा. त्याला पिनच्या मदतीने छिद्र पाडा. हा पेपरचा गोळा टॉयलेट फ्लश टँकमध्ये ठेवा. बॉलच्या छिद्रातून क्लिनर गळून पाण्यात मिसळेल. जेव्हा फ्लश कराल तेव्हा टॉयलेट स्वच्छ होईल. तसेच दुर्गंधी देखील येणारं नाही.
बेकिंग सोड्यामध्ये नैसर्गिक दुर्गंधीनाशक घटक आहे. जो डाग काढून टाकण्यास आणि गंध शोषण्यास उपयुक्त आहे. यात असणारे घटक टॉयलेट स्वच्छ करण्यास मदत करतात. आपल्या टॉयलेटमध्ये एक्झॉस्ट फॅन वापरा किंवा खिडकी असायला हवी. तसेच टॉयलेट सीट वापरल्यानंतर सीट आणि आजूबाजूचा परिसर कोरडा ठेवा. ओलाव्यामुळे दुर्गंधी आणि वास येणार नाही.