सकाळच्या दिवसांची सुरुवात ही अनेकांची चहाने होते. पण रोजच्या वापरामुळे चहाची गाळणी हळूहळू काळपट होऊ लागते.(tea strainer cleaning) त्यावर दुधाचे डाग, चहापत्तीचे डाग आणि तेलकटपणा साठतो. मग कितीही घासलं तरी गाळणी पूर्णपणे स्वच्छ होत नाही.(how to clean tea strainer) अनेकदा गाळणी घासताना जाळी वाकडी होते किंवा तुटते. अशावेळी आपल्याला नवीन गाळणी खरेदी करावी लागते. (easy kitchen cleaning hacks)पण आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे चहाची गाळणी सहज आणि लवकर स्वच्छ होते. यासाठी आपल्याला खसाखसा घासण्याची देखील गरज नाही.(remove tea stains from strainer) अनेक गृहिणींना गाळणी साफ करण्याचं काम नेहमी डोक्याला ताप वाटतं.(clean old tea strainer at home) कारण कितीही डिशवॉश वापरला तरी डाग तसेच राहतात.(natural ways to clean strainer) पाहुणे घरी आलेले असतात आणि चहा देताना गाळणी मळकट दिसते. पण ही सोपी ट्रिक वापरली तर जुनी गाळणी नव्यासारखी चमकेल.
ढाब्यावर मिळणारा कुरकुरीत कांदा पराठा करा घरीच, ६ टिप्स - पीठ होईल परफेक्ट, पराठा टम्म फुगेल
1. चहाची गाळणी कशी स्वच्छ करावी?
बहुतेक घरांमध्ये स्टील टी स्ट्रेनर वापरतात. स्टीलची स्ट्रेनर लवकर साफ होते. यासाठी आपल्याला गॅस पेटवून त्यावर स्टीलची गाळणी थोडी जाळायची आहे. याचा वास येऊ लागेल. स्ट्रेनरच्या छिद्रांमध्ये अडकलेली चहापत्ती जळू लागेल. स्ट्रेनर लाल झाल्यावर गॅस बंद करा. आता स्ट्रेनर थंड झाल्यावर स्क्रबरच्या मदतीने स्वच्छ करा. ज्यामुळे टी स्ट्रेनर नव्यासारखी स्वच्छ होईल.
2. प्लास्टिकची गाळणी कशी स्वच्छ कराल?
आपल्या घरातील चहाची गाळणी प्लास्टिकची असेल तर टूथब्रशने स्वच्छ करा. ब्रशवर डिश वॉश आणि बेकिंग सोडा लावा . काही वेळाने घासून घ्या. ज्यामुळे गाळणीला चिकटलेली चहापती लवकर निघेल.
3. चहाची गाळणी साफ करण्यासाठी खास ट्रिक
चहाच्या गाळणीवर लिंबू, व्हिनेगर आणि बेकिंग सोडाच्या द्रावणात काही वेळ भिजवा. यामुळे छिद्रांमध्ये अडकलेली घाण निघून जाईल. नंतर कापडाने स्वच्छ करा. टूथब्रशच्या मदतीने गाळणीची जाळी स्वच्छ करा. असं केल्याने चाळणी कायम स्वच्छ राहिल.