ज्या घरात लहान मूल असते त्या घरात भरपूर खेळणी असतात. ही खेळणी वेगवेगळ्या प्रकारची असतात. या खेळण्यांमध्ये अनेक प्रकार असतात, परंतु मुलांना जास्त करून सॉफ्ट टॉईजने खेळायला फार आवडते. सॉफ्ट टॉईज हे तुलनेने मऊ आणि नरम असतात, त्यामुळे मुलांना या या सॉफ्ट टॉईजने खेळायला फार आवडते. अशा सॉफ्ट टॉईजने खेळण्यामुळे मुलांना कोणत्याही प्रकारची इजा होण्याची शक्यता नसते. त्यामुळे अशा सॉफ्ट तोजने खेळणे मुलांच्या दृष्टीने चांगले असते. सॉफ्ट टॉईज हा खेळण्यांचा असा प्रकार आहे जो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. केवळ लहान मुलाचं नाहीत तर मोठी माणसं देखील असे सॉफ्ट टॉईज घरात ठेवणे किंवा झोपताना उशाशी घेणे पसंत करतात.
सॉफ्ट टॉईज धुण्याची योग्य पद्धत कोणती ?
१. सॉफ्ट टॉईज धुण्यापूर्वी ते व्हॅक्यूम करून घ्यावेत :- सॉफ्ट टॉईज खेळणी मऊ होण्यासाठी त्यात कापूस किंवा फोम भरला जातो. म्हणूनच पाण्यात धुण्यापूर्वी त्यांच्यावरची धूळ पूर्णपणे झटकून काढून टाकणे खूपच गरजेचे असते. जर पाण्यातून धुण्यापूर्वी त्यांच्यावरची धूळ स्वच्छ केली नाही तर ही धूळ पाण्यात मिसळून त्याच्या आतील कापूस किंवा फोम शोषून घेऊ शकतो. अशा स्थितीत या सॉफ्ट टॉईजवरची घाण पूर्णपणे साफ होत नाही आणि कापूस शोषून घेतो. अशावेळी सॉफ्ट टॉईज स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर किंवा मऊ ब्रश देखील वापरू शकतो. हे करताना खूप सावधगिरी बाळगावी. अशावेळी या सॉफ्ट टॉईजवर जास्त दबाव देऊन किंवा घासून धुण्याचा प्रयत्न करु नये.
२. डिटर्जंट आणि थंड पाण्याने धुवा :- जर या सॉफ्ट टॉईजवर डाग नसेल तर ते धुणे खूप सोपे असते. पण त्यावर कोणत्याही प्रकारचे डाग असल्यास बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून त्याची पेस्ट टायर करून त्या डागांवर लावावी. त्यानंतर ५ मिनिटांनी टिश्यूच्या मदतीने हा डाग चोळून चोळून काढावा. त्यानंतर थंड पाण्यात सौम्य डिटर्जंट मिसळून त्यात खेळणी बुडवून ठेवा. काही मिनिटांनंतर, हाताने किंवा मऊ ब्रशच्या मदतीने हलके चोळून स्वच्छ करा. नंतर खेळणी पिळून स्वच्छ पाण्यातून धुवून काढा.
फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो, फ्रिजमधून पाणी गळू लागते ? ७ सोपे उपाय, कुलिंगही होईल चांगले...
३. उन्हात वाळवण्यापूर्वी करा एक काम :- सॉफ्ट टॉईजमध्ये असलेल्या कापसामुळे आणि फोममुळे ही खेळणी धुताना त्यात जास्तीचे पाणी शोषले जाते. ही खेळणी धुतल्यानंतर ती वाळायला बराच वेळ लागतो. जर हे सॉफ्ट टॉईज सुकले नाही तर ते ओलाव्यामुळे अधिक दुर्गंधी येते आणि आतून कुजण्यास सुरुवात होते. यासाठी सॉफ्ट टॉईज धुवून झाल्यानंतर ही खेळणी उन्हांत वाळवण्याआधी धुतल्यानंतर एका कॉटनच्या टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवावी. असे केल्याने खेळण्यांमधील सर्व अतिरिक्त पाणी टॉवेलमध्ये शोषले जाईल. नंतर ते पिनने लटकवून किंवा हलक्या उन्हांत सुकण्यासाठी ठेवावे.
किचन कॅबिनेट- ट्रॉल्यांची दारं तेलकट-चिकट झाली? २ सोपे उपाय, कॅबिनेट चमकेल नव्यासारखं...
४. वॉशिंग मशीनमध्ये खेळणी धुताना घ्या काळजी :- हे सॉफ्ट टॉईज वॉशिंग मशीनमध्ये धुणे अगदीच सोपे असते. परंतु यासाठी एक जाळीदार पिशवी घेऊन त्यात ही सगळी खेळणी घालावी तसेच सौम्य डिटर्जंट पावडर घालावी. त्यानंतर ही जाळीदार पिशवी वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी टाकावी. हे सॉफ्ट टॉईज वॉशिंग मशीनमध्ये धुण्याआधी त्या सॉफ्ट टॉईजवर वॉशिंग मशीन सेफ असे लेबल असेल तरच सॉफ्ट टॉईज मशीनमध्ये धुणे योग्य आहे.