Join us

पांढरेशुभ्र स्नीकर्स कळकट झाले? ३ पदार्थ वापरा, मळलेल्या चपला होतील नव्याकोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2024 15:45 IST

How To Clean Sneakers Or Shoes: पांढरेशुभ्र स्नीकर्स किंवा बूट मळाले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पाहा...

हल्ली कॅज्यूअल लूक केल्यावर बरेच जण स्नीकर्स किंवा शूज घालतात. बऱ्याचदा स्नीकर्स आपण पांढरे, मोतिया, क्रिम किंवा यासारख्याच फिक्या रंगाचे घेतो. सुरुवातीला ते नवे असले की शुभ्र पांढरे, चकाचक दिसतात. पण काही दिवसांतच ते काळपट, मळकट होत जातात. खासकरून स्नीकर्सच्या सोलला जी पांढरीपट्टी असते, ती तर अगदीच मळकट दिसू लागते. हे शूज पाण्याने न धुताही स्वच्छ कसे करायचे, ते पाहूया.... (simple remedies to clean sneakers)

 

स्नीकर्स कसे स्वच्छ करायचे?

स्नीकर्स किंवा शूज कसे स्वच्छ करायचे, याचा उपाय santwinder_singh_waraich या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळलात? करा कैरी- टोमॅटोची चटपटीत चटणी, जेवणाची वाढेल मजा...

हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातले फक्त ३ पदार्थ वापरायचे आहेत. 

त्यासाठी आधी एका वाटीमध्ये १ टेबलस्पून लिक्विड डिशवॉश, १ टेबलस्पून कोलगेट आणि १ टेबलस्पून बेकिंग सोडा टाका. 

 

हे मिश्रण व्यवस्थित एकत्र कालवून घ्या आणि मग टुथब्रशच्या मदतीने बुटांवर लावा. यापुर्वी बूट पाणी शिंपडून थोडे ओलसर करून घ्या.

कशाला महागडं ब्लीच, डी- टॅन फेशियल करता? फक्त ५ रुपयांत चमकेल त्वचा- बघा हा उपाय

आता मिश्रण बुटांवर लावल्यानंतर काही मिनिटांसाठी ते तसेच राहू द्या... त्यानंतर एक कपडा ओला करा आणि त्याने बुट स्वच्छ पुसून घ्या. 

एकदा पुसून बूट स्वच्छ झाले नाहीत तर पुन्हा हा उपाय करा. स्निकर्स अगदी चकाचक होतील. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी