आता काही दिवसांतच गणरायाचे आगमन होणार आहे. त्यापाठोपाठ घरोघरी गौराईदेखील येते. आता गौरी गणपतीचा सण म्हणजे वर्षातला मोठा सण. या निमित्ताने घरात रोजच वेगवेगळे धार्मिक कार्य होत असते. आता या सगळ्या कार्यक्रमांसाठी आपण आपल्या ठेवणीतली खास चांदीची भांडी, वेगवेगळ्या चांदीच्या वस्तू बाहेर काढतो. आता चांदीच्या वस्तू म्हटल्या की त्या लवकर काळ्या पडतात. त्यांच्यावर एक काळसर झाक दिसू लागते (How To Clean Silver Items And Jewellery?). ती काढून टाकण्यासाठी आणि चांदीचे भांडे अगदी नव्यासारखे लख्खं करण्यासाठी हे काही सोपे उपाय करून पाहा.(simple tricks for polishing silver items at home)
चांदीच्या वस्तूंवरील काळसरपणा कसा दूर करावा?
चांदीचे भांडे स्वच्छ करण्यासाठी पुढे दोन वेगवेगळे उपाय सांगितले आहेत. त्यापैकी जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल त्यानुसार चांदीच्या भांड्यांची स्वच्छता तुम्ही करू शकता.
ना केस गळणार ना पांढरे होणार! 'हा' घरगुती शाम्पू वापरा- विकतचे महागडे शाम्पू विसरून जाल
१. सगळ्यात पहिला उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये टुथपेस्ट पावडर किंवा टुथपेस्ट घ्या. त्यामध्ये थोडा लिंबाचा रस घालून ती पावडर पातळ करून घ्या. आता चांदीच्या वस्तूंना ही पेस्ट लावून ठेवा. १५ मिनिटांनी ब्रश घेऊन चांदीची भांडी घासून काढा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. भांड्यांवरचा काळपटपणा जाऊन ते छान चमकतील.
२. दुसरा उपाय करण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईलचे लहान आकाराचे बॉल करून टाका. ते पाणी गॅसवर गरम करायला ठेवा.
मुंबई स्पेशल मसाला पाव- फक्त १५ मिनिटांत होणारी रेसिपी, चव अगदी गाड्यावर मिळते तशीच चमचमीत
यानंतर पाण्याला उकळी यायला सुरुवात झाल्यावर त्या पाण्यात चांदीच्या वस्तू टाकून ठेवा आणि ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर त्या सगळ्या वस्तू उकळवून घ्या. यानंतर पाणी कोमट होईपर्यंत चांदीच्या वस्तू त्याच भांड्यात राहू द्या. त्यानंतर चांदीची भांडी पाण्याच्या बाहेर काढा आणि त्यावर थोडंसं डिशवॉश लिक्विड घालून ते घाासून घ्या. भांडी अगदी नव्यासारखी स्वच्छ होतील.