Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकची चहा गाळणी काळीकुट्ट- घाण झाली? स्वयंपाकघरातील १ उपाय - मिनिटांत निघेल सर्व घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2026 09:30 IST

Cleaning stained kitchen tools: Easy kitchen hacks: Remove stubborn tea stains from plastic: प्लास्टिकची चहा गाळणी साफ करण्यासाठी सोप्या टिप्स

अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या गरमागरम चहानेच होते. पण चहा गाळणारी गाळणी कधी नीट पाहिली आहे का? अनेकदा आपण कपभर चहा बनवतो आणि गाळणी नळाखाली धरुन वरवर धुतो. पण या गाळणीच्या बारीक छिद्रांमध्ये चहा पावडर आणि दुधाचा थर साचून ती काळीकुट्ट किंवा पिवळी पडते.(Cleaning stained kitchen tools) ही घाण दिसायला खराब नसते तर ती आरोग्यासाठी देखील घातक ठरु शकते. अनेकदा गाळणी घासून आपले हात देखील दुखतात. पण तरीही तिचा काळपटपणा जात नाही.(Easy kitchen hacks) पण स्वयंपाकघरात असणाऱ्या पदार्थांपासून आपण गाळणी मिनिटांत साफ करु शकतो. (Remove stubborn tea stains from plastic)प्लास्टिकच्या चहाच्या गाळणीचे जाळे अतिशय बारीक असते, त्यामुळे त्यात चहा पावडरचे कण सहज अडकतात. एकदा हे कण अडकून कडक झाले की, डिशवॉशने निघणे अशक्य होते. मग आपण नवीन गाळणी विकत घेतो. पण आता तुम्हाला नवीन गाळणी घेण्याची अजिबात गरज नाही. 

तवा काळाकुट्ट झाला- तेलकट थर निघत नाही? २ रुपयांचा सोपा उपाय - तवा चमकेल आरशासारखा लखलखीत

गाळणी साफ करण्यासाठी आपल्याला बेकिंग सोडा आणि गरम पाण्याची आवश्यकता लागेल. बेकिंग सोडा हा नैसर्गिक क्लिनर म्हणून काम करतो ज्यामुळे प्लास्टिकची गाळणी पुन्हा नव्यासारखी चमकण्यास मदत होईल. यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका लहान पातेल्यात किंवा वाटीत चाळणी बुडले इतके पाणी घेऊन गरम करावे लागेल. खूप जास्त पाणी उकळू नका. 

आता गरम पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा आणि डिश वॉश लिक्विडचे काही थेंब घाला. हे मिश्रण चांगले मिसळून घ्या. काळीकुट्ट झालेली गाळणी या मिश्रणात ५ ते १० मिनिटांसाठी राहू द्या. बेकिंग सोड्यामुळे चहाचा चिकट थर आपोआप निघतो. १० मिनिटानंतर जुना टूथब्रश घ्या आणि गाळणीच्या जाळ्यावर हलक्या हाताने घासा. यामुळे छिद्रांमध्ये अडकलेली घाण सहज निघेल. 

आपण १ चमचा बेकिंग सोडा आणि त्यात २ चमचे पांढरा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून याचे मिश्रण तयार करु शकतो. त्यात गाळणी बुडवून, जुन्या टूथब्रशच्या मदतीने गाळणीवर सर्व मिश्रण परसरवा. अर्ध्या तासानंतर ब्रशनच्या मदतीने गाळणी घासून स्वच्छ करा. नव्यासारखी गाळणी चमकेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Clean stained tea strainer easily with this kitchen ingredient.

Web Summary : Clean a dirty tea strainer with baking soda and hot water. Soak, scrub with a toothbrush, or use vinegar/lemon for a sparkling clean strainer.
टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स