Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाथरुममधील प्लास्टिकच्या बादल्यांवर पिवळे- पाण्याचे डाग? घासण्याची कटकट सोडा, ५ घरगुती उपाय- बादली चमकेल नव्यासारखी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2026 14:08 IST

Remove hard water stains from plastic: Home remedies for sparkling clean bathroom plastic:जास्त मेहनत न घेता कमी वेळात डाग घालवायचे असतील तर काही सोपे घरगुती उपाय केल्यास बादली नव्यासारखी चमकेल.

आपण रोजच बाथरुम आणि त्याचा आत ठेवलेल्या सामानाचा वापर करतो. अनेकदा घराची साफसफाई केली जाते पण बाथरुमच्या साफसफाईकडे कायमच काना डोळा करतो. बाथरुममध्ये असणारे प्लास्टिक बादली, मग यामध्ये पाणी साठवले जाते. आंघोळ, कपडे धुणे यांसारखी कामे झटपट होतात.(Remove hard water stains from plastic) बादल्यांच्या सततच्या वापरामुळे शिवाय खारे, गढूळ पाण्यामुळे बादल्या खराब होतात. त्यावर काळे-पिवळे पाण्याचे मेणचट डाग दिसतात. (Home remedies for sparkling clean bathroom plastic)बाथरुममध्ये वारंवार पाण्याचा वापर झाल्यामुळे बादली आणि मग यांसारख्या प्लास्टिकच्या वस्तूंवर पांढरे किंवा पिवळे डाग पडतात. हे डाग पाण्यातील क्षार आणि साबणाच्या फेसामुळे तयार होतात. हे हट्टी डाग काढण्यासाठी आपण साबण आणि डिटर्जंटचा वापर करतो. पण यामुळे बादलीचा रंग उडून जातो. जास्त मेहनत न घेता कमी वेळात डाग घालवायचे असतील तर काही सोपे घरगुती उपाय केल्यास बादली नव्यासारखी चमकेल. 

आई-आजीच्या जुन्या पैठणी साडीचा शिवा पार्टीवेअर ड्रेस- ५ ट्रेडिंग पॅटर्न, इंडो-वेस्टन ड्रेसचा स्वस्तात- मस्त पर्याय

1. व्हिनेगर आणि पाण्याच्या मिश्रणाने आपण बादल्यांवरचे डाग काढू शकतो. यासाठी एका बादलीत गरम पाणी घेऊन त्यात एक कप पांढरे व्हिनेगर मिसळा. या पाण्यात बादली किंवा मग अर्धा तास बुडवून ठेवा. व्हिनेगरमधील अॅसिड डाग कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे ते सहज निघतात. 

2. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करुन त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट डाग असलेल्या जागी लावून     १० ते १५ मिनिटे राहू द्या. नंतर साध्या कापडाने पुसा, बादल्यांवरील पिवळसरपणा निघून जाईल. 

3. लिंबाच्या फोडीवर थोडे मीठ घालून डाग असलेल्या भागावर हलक्या हाताने चोळा. लिंबाचा नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आणि मिठाचा खरखरीतपणा प्लास्टिकला न घासता स्वच्छ करतो. आणि बादली नव्यासारखी चमकवतो. 

4. जर बादलीवर खूपच जुने आणि चिकट डाग असतील, तर हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करायला हवा. कापसाच्या बोळ्याने हे द्रावण बादलीच्या हट्टी डागांवर लावा. काही वेळाने पाण्याने बादली धुवा. 

5. साध्या डिशवॉशिंग लिक्विडमध्ये थोडे कोमट पाणी मिसळून त्याने बादली धुवायला हवी. साबणाचे चिकट डाग सहज निघून जातात. आणि बादली नव्यासारखी चमकते. बादली आणि मग वर घाणीचा अत्यंत हट्टी किंवा जाड थर साचला असेल, तर ब्लीच पावडरचा वापर करा. यासाठी थोडी ब्लीच पावडर घ्या. त्यामध्ये थोडे पाणी मिसळून त्याची जाड-घट्ट पेस्ट तयार करा. ही तयार झालेली पेस्ट बादली किंवा मगच्या पृष्ठभागावर व्यवस्थित लावून काही वेळ तशीच राहू द्या. त्यानंतर ब्रशच्या साहाय्याने तो भाग घासून स्वच्छ करा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. 

English
हिंदी सारांश
Web Title : Clean bathroom buckets easily with these 5 home remedies.

Web Summary : Remove hard water stains from plastic buckets using vinegar, baking soda, lemon, hydrogen peroxide, or dishwashing liquid. These simple home remedies will make your bathroom plastic sparkle like new.
टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स