Join us  

नव्या झाडूने झाडताना खूपच भुसा बाहेर येतो? २ सोप्या ट्रिक्स, झाडू होईल स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2024 12:17 PM

How To Make New Broom Dust Free: नविन झाडूने घर झाडण्यापूर्वी हा उपाय करून पहा. झाडू स्वच्छ होऊन जाईल, त्यामुळे मग झाडताना त्यातून भुसकट कचरा गळणार नाही. (try these 2 hacks before using new broom)

ठळक मुद्देही क्रिया ३ ते ४ वेळा करा. यामुळे झाडूमध्ये राहिलेलं सगळं भुसकट, कचरा निघून जाईल आणि झाडू बऱ्याच प्रमाणात स्वच्छ होईल.

नविन आणलेल्या झाडूने घर झाडताना सुरुवातीचे काही दिवस हा अनुभव जवळपास प्रत्येकालाच येतो. घरातला कचरा कमी आणि झाडूतून गळणारा कचरा किंवा भुगाच जास्त असतो. त्यामुळे मग सुरुवातीचे काही दिवस नव्या झाडूने घर झाडताना अगदी वैताग येऊन जातो. असा त्रास होऊ नये म्हणून या दोन सोप्या टिप्स बघून घ्या (How to clean new broom?). यामुळे झाडूतला सगळा भुसा किंवा भुसकट निघून जाईल (2 hacks before using new broom). जेणेकरून मग घर झाडताना त्यातून जास्त भुसा गळणार नाही. (how to make new broom dust free)

 

नवा झाडू वापरायला काढण्यापुर्वी हे २ उपाय करा

नविन आणलेल्या झाडूने घर झाडताना त्यातून खूप भुसा बाहेर पडतो. असं होऊ नये म्हणून तो झाडू वापरात काढण्यापुर्वी कशा पद्धतीने स्वच्छ करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

फेशियलसाठी पार्लरला जायला वेळच मिळेना? बघा १ सोपा उपाय- डायमंड फेशियलसारखा ग्लो मिळेल

यात सांगितलेला पहिला उपाय म्हणजे झाडू जेव्हा पॅक असतो तेव्हा तो थोडा आपटून घ्या. त्यामुळे त्याच्यातला भुसा बऱ्याच प्रमाणात गळून जाईल आणि झाडू बराचसा स्वच्छ होईल.

 

वरचा पहिला उपाय करून झाल्यानंतर आता हा दुसरा उपाय करा. यासाठी झाडू पॅकिंगमधून बाहेर काढा. जमिनीवर एक पेपर पसरवून ठेवा आणि त्यावर झाडू ठेवा.

कुंडीमध्ये लावता येतील 'या' मसाल्यांची रोपं, करा प्रयोग- घेऊन पाहा घरच्या मसाल्यांचा स्वाद

आता कपडे धुण्याचा जो ब्रश असतो तो झाडूवर घासा. वरून खाली अशा पद्धतीने एकाच दिशेने ब्रश घासा. ही क्रिया ३ ते ४ वेळा करा. यामुळे झाडूमध्ये राहिलेलं सगळं भुसकट, कचरा निघून जाईल आणि झाडू बऱ्याच प्रमाणात स्वच्छ होईल.

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजन