Join us

पांढऱ्याशुभ्र देवघरावर धूप-अगरबत्तीचे डाग? १ सोपा उपाय, देवघर दिसेल नव्यासारखे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2025 18:57 IST

how to clean marble temple : How do you clean a marble temple in your house : White marble mandir cleaning tips : घरातील पांढऱ्याशुभ्र मार्बल किंवा संगमरवरी देवघरावरील कापूर - धूप किंवा अगरबत्तीच्या धुराचे काळे डाग काढण्यासाठी टिप्स...

आपल्या सगळ्यांच्याच घरात एक छोटेसे देवघर असतेच. हे देवघर सागवानी लाकूड, संगमरवरी किंवा रंगीबेरंगी मार्बल्स अशा अनेक वेगवेगळ्या मटेरियल पासून (how to clean marble temple) तयार केलेले असते. शक्यतो बहुतेकांच्या घरी पांढऱ्याशुभ्र मार्बल्स किंवा संगमरवरी दगडापासून तयार केलेलं सुंदर असं मंदिर असत. हे देवघर किंवा छोटेसे मंदिर आपण वेळोवेळो (White marble mandir cleaning tips)  धुवून - पुसून स्वच्छ ठेवतोच. परंतु देवघर म्हटलं की धूप, कापूर, अगरबत्ती लावणे ओघाने आलेच. देवघरात आपण पूजा - आरती करताना दिवा लावतो किंवा कापूर - अगरबत्ती धूप लावतो. यामुळे त्यातून (How do I maintain the shine of a marble temple?) निघणाऱ्या काळ्या काजळी आणि धुरामुळे आपले पांढरेशुभ्र संगमरवरी मंदिर काळे पडते.

या मंदिराच्या वेगवेगळ्या भागावर काळे डाग पडलेले दिसतात. परंतु या काळ्या डागांमुळे आपल्या मंदीराची शोभा कमी होते. पांढऱ्याशुभ्र देवघरावरील असे काळे डाग काढण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. परंतु काहीवेळा हे डाग इतके हट्टी असतात की जाता जात नाहीत. अशावेळी नेमकं काय करावं हे समजत नाही. घरातील पांढऱ्याशुभ्र मार्बल किंवा संगमरवरी देवघरावरील कापूर - धूप किंवा अगरबत्तीच्या धुराचे काळे डाग काढायचे असतील तर या एका घरगुती उपायाचा आपण नक्की वापर करु शकतो.     

टोमॅटोच्या पल्पचा असा करा वापर... 

किचनमध्ये डाळ, भाजी, आमटी तयार करण्यासाठी म्हणून वापरण्यात येणारा टोमॅटो करेल असरदार उपाय. टोमॅटोचा वापर आपण जेवणात तर करतोच,  याशिवाय आपण पांढऱ्याशुभ्र देवघरावरील धूप - अगरबत्तीचे काळे डाग काढण्यासाठी देखील याच टोमॅटोच्या पल्पचा देखील वापर करू शकतो.  

आता कितीही कपडे धुतले तरीही साबण संपणार नाही, विकत घ्या १३० रुपयांचे 'सोप रोलर', होईल पैशांची बचत!

देवघरावरील धूप - अगरबत्तीचे काळे डाग काढण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात टोमॅटो घेऊन तो हाताने दाब देत त्यातील पल्प काढून घ्यावा. त्यानंतर या टोमॅटोच्या पल्पमध्ये लिक्विड डिश वॉश सोप, शाम्पू आणि लिंबाचा रस घालूंन सगळे जिन्नस एकत्रित मिसळून घ्यावे. हे तयार मिश्रण आपण एका बाटलीत भरुन स्टोअर करून ठेवू शकता. 

पांढऱ्याशुभ्र देवघरावरील धूप - अगरबत्तीचे काळे डाग काढण्यासाठी ही तयार पेस्ट काळ्या झालेल्या भागांवर स्पंज किंवा स्क्रबरच्या मदतीने लावून घ्यावीत. त्यानंतर एका जुन्या टूथब्रशच्या मदतीने हे डाग घासून घ्यावेत. त्यानंतर ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावे. 

तासंतास पुऱ्या लाटण्याची झंझटच विसरा! फक्त ९९ रुपयांत आणा 'पुरी कटर' - वेळखाऊ काम होईल पटकन...

यासोबतच आपण टोमॅटोच्या पेस्टमध्ये बेकिंग सोडा आणि लिक्विड डिश वॉश सोप घालून त्याचे देखील असेच द्रावण तयार करुन एका बाटलीत स्टोअर करून ठेवू शकतो. त्यांनंतर हे द्रावण स्पंज किंवा स्क्रबरवर घेऊन थेट डागांवर लावून घासा. त्यानंतर देवघर ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्यावेत. 

अशाप्रकारे आपण टोमॅटो पल्पचा वापर करून अगदी मिनिटभरात देवघरावरील कापूर - धूप किंवा अगरबत्तीच्या धुराचे काळे डाग अगदी सहजपणे काढू शकतो.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स