Join us

हात-भांडी पुसण्याचे किचन नॅपकिन्स कळकट झाले? १ उपाय- मळलेले नॅपकिन्स होतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2025 14:53 IST

Cleaning Tips: स्वयंपाक घरातले नॅपकिन्स काळपट झाले असतील तर ते पुन्हा स्वच्छ करण्यासाठी हा उपाय करून बघा.(simple and easy trick to remove oily, yellow stains from kitchen napkins?)

ठळक मुद्देया पद्धतीने किचन नॅपकिन्स धुण्याची सवय जर तुम्ही स्वत:ला लावून घेतली तर कित्येक दिवस तुम्ही ते नव्यासारखे टिकवून ठेवू शकता.

स्वयंपाक घरात आपण नेहमीच दोन ते तीन प्रकारच्या वेगवेगळ्या नॅपकिन्सचा उपयोग करत असतो. एखादा नॅपकिन हात पुसण्यासाठी असतो तर दुसरा नॅपकिन भांडी पुसण्यासाठी असतो. डायनिंग टेबल, ओटा, गॅस पुसण्यासाठीही वेगवेगळे नॅपकिन्स असतात. या सगळ्याच नॅपकिन्सला नेहमीच तेलकट, तुपकट हात लागतात. त्यांच्यावर मसाले सांडतात. त्याशिवाय स्वयंपाक घरातले इतर पदार्थही त्यांच्यावर नेहमीच पडतात. त्यामुळे मग काही दिवसांतच हे नॅपकिन्स खूप तेलकट होऊन जातात. त्यांना पिवळट- काळपट रंग येतो आणि ते कितीही धुतले तरी हाताला जाडसर, ओशट लागतात (how to clean kitchen towels and napkins?). तुमचेही नवे आणलेले किचन नॅपकिन्स काही दिवसांतच कळकट होत असतील तर हा एक उपाय करून पाहा.(simple and easy trick to remove oily, yellow stains from kitchen napkins?)

 

किचन नॅपकिन्स कसे स्वच्छ करावेत?  

तेल, तूप, मसाले, स्वयंपाक घरातले खरकटे पदार्थ यांच्या संपर्कात असणारे स्वयंपाक घरातले नॅपकिन्स स्वच्छ करण्यासाठी आपली नेहमीची कपडे धुण्याची पद्धत खूप उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे त्यासाठी ही थोडी वेगळी पद्धत वापरून पाहा.  

कबुतरांनी बाल्कनीत उच्छाद मांडलाय? १८० रुपयांची 'ही' वस्तू आणा- कबूतरं पुन्हा कधीच येणार नाहीत 

या पद्धतीने किचन नॅपकिन्स धुण्याची सवय जर तुम्ही स्वत:ला लावून घेतली तर कित्येक दिवस तुम्ही ते नव्यासारखे टिकवून ठेवू शकता. त्यासाठी नेमकं काय करायचं या विषयीचा उपाय manjumittal.homehacks या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

 

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तर एका भांड्यात अगदी कडक, उकळतं पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा, २ चमचे तुमच्या घरात असलेलं कोणतंही डिटर्जंट आणि पाव वाटी व्हिनेगर घाला. हे तिन्ही पदार्थ पाण्यात व्यवस्थित मिसळले की त्यामध्ये किचन नॅपकिन्स अर्ध्या तासासाठी भिजत ठेवा.

कमी वयातच गुडघे दुखतात? आलिया भट- करीना कपूरची फिटनेस ट्रेनर सांगतेय ५ सोपे व्यायाम 

अर्ध्या तासानंतर पाण्यात भिजत घातलेले नॅपकिन्स ब्रशने थोडे घासून काढा आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नॅपकिनवर आलेला सगळा काळपटपणा, पिवळटपणा पुर्णपणे निघून गेलेला दिसेल आणि नॅपकिन नव्यासारखे अगदी स्वच्छ, चमकदार झालेले असतील. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल