Join us

लोखंडी तव्यावर पोळ्या जळतात? 'या' पद्धतीने तवा स्वच्छ करा- पोळ्या जळणार नाहीत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2025 19:14 IST

Cleaning Tips: लोखंडी तव्यावर पोळ्या चांगल्या भाजल्या जात नाहीत, असा अनुभव अनेकजणींना येतो (how to clean iron pan?). त्यासाठीच या काही खास टिप्स..(why do roti or chapati get burnt on iron pan?)

ठळक मुद्देसकाळच्या धावपळीत अनेकजणी लोखंडी तवा वापरणं टाळतात. पुढे सांगितलेल्या पद्धतीने लोखंडी तवा स्वच्छ करून पाहा..

जेवणात एकवेळ भाजी, वरण, भात यापैकी एखादा पदार्थ नसेल तरी चालते. पण पोळ्या मात्र लागतातच. पोळ्यांची जागा कधीकधी भाकरी, फुलके, दशमी, पराठे असे पदार्थही घेतात. पण यापैकी एखादा पदार्थ तरी हमखास लागतोच. पोळ्या किंवा चपात्या भाजण्यासाठी लोखंडी तवा वापरावा असं सांगितलं जातं. पण ज्या महिला लोखंडी तवा वापरतात त्यांना असा अनुभव येतो की गॅसची फ्लेम थोडी मोठी केली तरी लगेचच पोळी जळते (why do roti or chapati get burnt on iron pan?). ठिकठिकाणी करपते. त्यामुळे सकाळच्या धावपळीत मग अनेकजणी लोखंडी तवा वापरणं टाळतात. तुम्हालाही असाचा अनुभव येत असेल तर एकदा पुढे सांगितलेल्या पद्धतीने लोखंडी तवा स्वच्छ करून पाहा..(how to clean iron pan for making perfect rotis?)

 

लोखंडी तवा कसा स्वच्छ करावा?

लोखंडी तवा कसा स्वच्छ करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ gharelu_upchar_tips या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सगळ्यात आधी तर लोखंडी तवा गॅसवर ठेवून थोडा गरम करून घ्या.

साखरआंब्याला बुरा येऊन लगेच खराब होतो? घ्या रेसिपी- पाक परफेक्ट होऊन वर्षभर टिकेल 

तवा गरम झाल्यानंतर त्यावर १ चमचा तुमच्या घरात असणारा कोणताही शाम्पू टाका. यानंतर त्यामध्ये १ चमचा मीठ टाका. आता मीठ आणि शाम्पूचे मिश्रण एखाद्या ब्रशच्या साहाय्याने संपूर्ण तव्यावर पसरवून घ्या. यानंतर त्यावर थोडं पाणी ओता.

 

आता त्या पाण्यामध्ये लगेचच अर्धे लिंबू पिळून टाका. आता लिंबाच्या सालांचा वापर करूनच हे मिश्रण सगळ्या तव्याला लावा आणि त्यानेच तवा घासून काढा. साधारण एखादा मिनिट ही क्रिया केल्यानंतर एखादी तारेची घासणी घ्या आणि त्या घासणीने तवा स्वच्छ घासून काढा.

उकडलेले बटाटे सोलताना हात पोळतात? १ भन्नाट आयडिया- काही सेकंदातच सोला किलोभर बटाटे..

यानंतर तवा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तवा अगदी स्वच्छ आणि चकाचक होईल. तसेच तव्याचा पृष्ठभाग अगदी मऊ आणि गुळगुळीत होऊन जाईल. आता यापद्धतीने स्वच्छ केलेल्या तव्यावर जेव्हा तुम्ही पोळ्या कराल, तेव्हा त्या अजिबात जळणार नाहीत. छान भाजल्या जाऊन टम्म फुगतील आणि अगदी मऊसूत होतील. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सअन्नहोम रेमेडी