दसरा हा वर्षाचा एक मोठा सण. यादिवशी सोनं लुटायच्या निमित्ताने मित्रमंडळी, नातेवाईक आपल्या घरी येतात. अशावेळी आपलं घर स्वच्छ, टापटीप असायला हवं. पण घराची स्वच्छता करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ नसेल तर या काही सोप्या गोष्टी करून पाहा. यामुळे कमीतकमी वेळेत तुमचं घर अगदी लख्खं होऊ शकतं. त्यासाठी नेमकं काय करायला हवं ते आता पाहूया..(cleaning tips for home in festive season)
कमीतकमी वेळेत घर कसं स्वच्छ करायचं?
कमीतकमी वेळेत घर आवरायचं असेल तर सगळ्यात आधी एक मुख्य गोष्ट करा आणि ती म्हणजे घरात जो काही पसारा किंवा न लागणाऱ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत त्या सगळ्या जागेवर ठेवून द्या. कपाटात जर त्या वस्तू ठेवून दिल्या तर बाहेर अजिबात पसारा दिसणार नाही.
कशाला हवेत विकतचे महागडे स्क्रब? किचनमधले ४ पदार्थ चेहऱ्यावर चोळा- टॅनिंग, डेडस्किन होईल गायब
दुसरी गोष्ट म्हणजे घरातलं फर्निचर पुसायला वेळ नसेल तर ऑलिव्ह ऑईल आणि कोणत्याही एका इसेंशियल ऑईलचे काही थेंब एकत्र करा आणि हे मिश्रण फर्निचरवर शिंपडा. आता स्वच्छ, सुती कपड्याने फर्निचर पुसून काढा. त्यावरची धूळ तर स्वच्छ होईलच पण तेलामुळे ते छान चमकू लागेल.
किचन ओटा, गॅस शेगडी आणि त्याच्या आजुबाजुच्या फरशांवरचा चिकटपणा घालवायचा असेल तर व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि पाणी यांचं मिश्रण घ्या आणि त्याने चिकट टाईल्स पुसून काढा. चिकटपणा जाऊन त्या छान चकचकीत होतील.
वर्तमान पत्राचा कागद घेऊन तो थोडा ओलसर करा आणि त्याने घरातले आरसे, खिडक्यांच्या काचा पुसा. सगळं अगदी स्वच्छ होईल.
चहा, कॉफी आणि लिंबूपाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? कोणत्या वेळी काय प्यावं, वाचा खास माहिती
फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडा बेकिंग सोडा आणि थोडा शाम्पू टाका. फरशा स्वच्छ तर होतीलच पण घरात मंद सुगंधही जाणवेल.
फ्रिजमधले न लागणारे पदार्थ सगळे बाहेर काढून टाका आणि लिंबाच्या फोडी फ्रिजमध्ये ठिकठिकाणी ठेवा. फ्रिजमधून येणारा कुबट वास निघून जाईल.