Lokmat Sakhi >Social Viral > कंगव्यात अडलेला केसांचा गुंता निघता निघत नाही? २ झटपट ट्रिक्स- हेअर ब्रश होतील नव्यासारखे स्वच्छ

कंगव्यात अडलेला केसांचा गुंता निघता निघत नाही? २ झटपट ट्रिक्स- हेअर ब्रश होतील नव्यासारखे स्वच्छ

How to clean hairbrush : How To Clean Hairbrushes Quick & Easy : the easiest way to clean a hair brush : केसांच्या अनेक समस्या घाणेरडे हेअर ब्रश वापरल्याने होतात, ते टाळण्यासाठी ब्रश स्वच्छ करण्याच्या टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2024 16:33 IST2024-11-30T18:25:17+5:302024-12-02T16:33:28+5:30

How to clean hairbrush : How To Clean Hairbrushes Quick & Easy : the easiest way to clean a hair brush : केसांच्या अनेक समस्या घाणेरडे हेअर ब्रश वापरल्याने होतात, ते टाळण्यासाठी ब्रश स्वच्छ करण्याच्या टिप्स..

How to clean hairbrush How To Clean Hairbrushes Quick & Easy the easiest way to clean a hair brush | कंगव्यात अडलेला केसांचा गुंता निघता निघत नाही? २ झटपट ट्रिक्स- हेअर ब्रश होतील नव्यासारखे स्वच्छ

कंगव्यात अडलेला केसांचा गुंता निघता निघत नाही? २ झटपट ट्रिक्स- हेअर ब्रश होतील नव्यासारखे स्वच्छ

केस विंचरण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कंगवे, ब्रश यांचा वापर करतो. काहीवेळा केसांच्या विविध प्रकारच्या हेअर स्टाईल करायच्या म्हटलं की आपण त्यानुसार कंगव्याचे प्रकार निवडतो. केसांचा आकार, पोत, प्रकार या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच आपण योग्य त्या कंगव्याची निवड करतो. केस विंचरणे, केसांचे आरोग्य राखणे, केसांतील गुंता सोडवणे अशा विविध कारणांसाठी आपण रोज कंगवा किंवा ब्रशचा वापर करतो(How to clean hairbrush).

कंगव्यासोबतच आजकाल केसांसाठी हेअर ब्रशचा देखील वापर केला जातो. केसांसाठी हेअर ब्रश वापरल्याने केसांतील गुंता अतिशय सहज पद्धतीने सोडवला जातो. केसांसाठी असा लहान दातांचा हेअर ब्रश (the easiest way to clean a hair brush) सगळ्यांकडेच असतो. हा हेअर ब्रश केसांसाठी जसा फायदेशीर आहे  तसे त्याचे तोटे देखील आहेत. केसांसाठीचा हेअर ब्रश रोज वापरत असलो तरीही स्वच्छता फारच क्वचितच करतो. हेअर ब्रश वेळच्यावेळी स्वच्छ केला नाही तर त्यात काळा थर व केसांचा गुंता जमा होतो. असा अस्वच्छ हेअर ब्रश जर आपण सतत वापरात राहिलो तर त्याचे हानिकारक परिणाम आपल्या केसांवर दिसू लागतात. यासाठी हेअर ब्रश वारंवार स्वच्छ करण्याऐवजी आपण दोन सोप्या ट्रिकचा वापर करुन हेअर ब्रश स्वच्छ ठेवू शकतो. या ट्रिक्सचा वापर करुन हेअर ब्रशमध्ये केस अडकण्याची समस्या कायमसाठी दूर करु शकतो(How To Clean Hairbrushes Quick & Easy).

हेअर ब्रशमध्ये केस अडकून राहू नये म्हणून नेमके काय करावे ? 

१. हेअर ब्रशमध्ये केस अडकून राहू नये म्हणून आपण वेट टिश्यूचा वापर करु शकतो. वेट टिश्यू घेऊन त्याची घडी संपूर्णपणे उघडून घ्यावी. आता हा वेट टिश्यू हेअर ब्रशच्या दातांमध्ये व्यवस्थित अडकून बसेल असा ठेवावा. वेट टिश्यू हेअर ब्रशचे जिथे दात असतील त्या भागावर अंथरुन घ्यावा, नंतर दुसऱ्या फणीच्या मदतीने दाब देत हा वेट टिश्यू हेअर ब्रशच्या सपाट पृष्ठभागाला चिकटेल असा अलगद खाली न्यावा.

त्यानंतर केस विंचरुन घ्यावेत. हा उपाय केल्याने आपले केस हेअर ब्रशच्या मदतीने अतिशय व्यवस्थितरीत्या सेट केले जातील. त्याचबरोबर जर का केस गळत असतील तर ते केस हेअर ब्रशच्या पृष्ठभागावर असणाऱ्या वेट टिश्यूवर जाऊन चिकटतील. केस विंचरुन झाल्यानंतर हा वेट टिश्यू काढून फेकून द्यावा. यामुळे या हेअर ब्रशमध्ये केस अडकून राहत नाहीत याचबरोबर केस अडकून राहिले तर ते वेट टिश्यूवर अडकतात त्यामुळे ते काढणे सोपे होते. अशाप्रकारे आपण वेट टिश्यूचा वापर करुन आपला हेअर ब्रश स्वच्छ ठेवू शकता.

त्वचेवरील ॲक्ने कमी करण्यासाठी मलायका अरोरा वापरते हा खास 'देसी उपाय',आता पार्लरला जायची गरजच नाही...


ब्यूटी एक्स्पर्ट शहनाज हुसेन सांगतात, त्वचेसाठी फेसपॅकपासून-स्क्रबरपर्यंत तुळशीच्या पानांचा 'या' पद्धतीने करा वापर!

२. याचबरोबर आपण दुसऱ्या आणखी एका सोप्या ट्रिकचा देखील वापर करु शकता. यासाठी आपल्याला फक्त दोन ब्रश लागतील. एका हातात एक ब्रश याप्रमाणे दोन हातात दोन ब्रश घेऊन त्या ब्रशच्या ज्या भागातून आपण आपले केस विंचरतो ते भाग बरोबर एकमेकांसमोर आणून ते एकमेकांत अडकवून घ्यावेत. आता या ब्रशचे दात एकमेकांत अडकल्यानंतर दोन्ही ब्रश एकमेकांवर घासून घ्यावेत. दोन्ही ब्रश एकमेकांवर घासून घेतल्याने एकमेकांत अडकलेल्या ब्रशच्या दातांमुळे घर्षण होऊन ब्रशमध्ये अडकलेले केस अगदी सहजरीत्या बाहेर पडतात. 

थंडीत त्वचेला मायेनं लावा या ५ पैकी १ गोष्ट रोज, कोरडी त्वचा-पायाला भेगा- सगळ्यांवर उत्तम उपाय...


या दोन सोप्या भन्नाट ट्रिक्स वापरुन आपण फारशी मेहेनत न घेता केस विंचरण्याच्या ब्रशमधील केसांचा गुंता अगदी सहजपणे काढू शकतो.

Web Title: How to clean hairbrush How To Clean Hairbrushes Quick & Easy the easiest way to clean a hair brush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.