आपल्या दैनंदिन आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि रोज वापरली जाणारी गोष्ट म्हणजे फ्रीज. यामध्ये आपण अनेक अन्नपदार्थ साठवून ठेवतो. अनेकदा आपल्या फ्रीजमध्ये काही पदार्थ कोंबलेले असतात.(kitchen cleaning hacks for fridge) फळे, भाज्या, सॉस, ज्यूस, दूध किंवा इतर पॅकेट्स. यामुळे ते काढताना किंवा ठेवताना काहीतरी सांडतं आणि फ्रीज घाण होते. (natural fridge cleaning hacks)आठवड्यातून एकदा फ्रीज साफ करायला हवे. फ्रीज साफ न केल्यास त्यातून पदार्थांचा वास येऊ लागतो.(easy ways to clean refrigerator) अनेकदा यामुळे आतील पदार्थ देखील खराब होतात.(shiny fridge cleaning tricks) आपल्याकडून फ्रीज वेळच्या वेळी साफ होत नाही. यामुळे मग फ्रीज जास्त अस्वच्छ होतं, तेव्हा फ्रीज आपण साफ करायला घेतो. (best way to clean fridge naturally)
तेलाची बाटली चिकट-तेलकट झाली? सोपे उपाय- बाटली होईल एकदम चकाचक
फ्रीजमध्ये डाग पडणे, त्याच्या रबरमध्ये घाण साचणे, ज्यूसचे किंवा इतर पदार्थांच्या वासामुळे अनेकदा आपण काही सोपे घरगुती उपाय करतो. पण अशावेळी भाज्यांच्या किंवा पदार्थांचा कुबट वास येऊच लागतो. फ्रीजचा वास येऊ नये यांसाठी आपण लिंबू कापून ठेवतो. परंतु, फ्रीज अधिक दिवस चांगल्या पद्धतीने साफ केला नसेल तर त्याचा उग्र वास येतो. पण हे सोपे घरगुती उपाय केले तर फ्रीज साफ होण्यासाठी थोडा वेळ लागेल पण व्यवस्थित साफ होऊन नव्यासारखा चमकेल.
1. फ्रीज साफ करण्यापूर्वी सगळ्यात आधी फ्रीजमधलं सामान बाहेर काढा. त्यानंतर ओल्या कापडाने फ्रीज स्वच्छ करा.
2. एक चमचा डिश वॉश आणि एत चमचा व्हिनेगर घालून त्याचा स्प्रे तयार करा. या स्प्रे ने फ्रीज स्वच्छ करा. भाज्यांचे बकेट स्वच्छ पाण्याने धुवा.
3. फ्रीजमध्ये डाग असतील तर लिंबूवर बेकिंग सोडा टाकून घासा. ज्यामुळे हट्टी डाग निघण्यास मदत होईल.
4. फ्रीजच्या रबर घाण किंवा धुळ साचली असेल तर ब्रशने साफ करा. स्प्रे मारुन वाईप्सने स्वच्छ करा. स्वच्छ कापडाने पुसा.
5. दर आठवड्याला असे केले तर फ्रीज व्यवस्थितरित्या साफ होईल. तसेच कुबट आणि उग्र वास येणार नाही. फ्रीज नव्यासारखा चमकेल.