lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > दरवाज्यांचे हॅण्डल्स, कड्या स्वच्छ करण्यासाठी ३ सोपे उपाय, कडी- कोंडे होतील चकाचक 

दरवाज्यांचे हॅण्डल्स, कड्या स्वच्छ करण्यासाठी ३ सोपे उपाय, कडी- कोंडे होतील चकाचक 

Cleaning Tips: दरवाज्यांचे हॅण्डल्स किंवा कड्या हात लावून लावून खराब होऊन जातात. ते स्वच्छ करण्यासाठी हे काही उपाय करून बघा (How to clean door handles?).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2022 10:32 AM2022-09-04T10:32:36+5:302022-09-04T10:35:01+5:30

Cleaning Tips: दरवाज्यांचे हॅण्डल्स किंवा कड्या हात लावून लावून खराब होऊन जातात. ते स्वच्छ करण्यासाठी हे काही उपाय करून बघा (How to clean door handles?).

How to clean door handles? How to get rid from the stains on door handles? | दरवाज्यांचे हॅण्डल्स, कड्या स्वच्छ करण्यासाठी ३ सोपे उपाय, कडी- कोंडे होतील चकाचक 

दरवाज्यांचे हॅण्डल्स, कड्या स्वच्छ करण्यासाठी ३ सोपे उपाय, कडी- कोंडे होतील चकाचक 

Highlightsहे उपाय करून दरवाज्यांचे हॅण्डल आणि कडी- कोंडे चटकन स्वच्छ करता येतील. 

आपण एरवी आपल्या रोजच्या कामामध्ये घर झाडणं, पुसणं, फर्निचरची स्वच्छता (cleaning tips) अशी सगळी स्वच्छतेची कामं करतच असतो. पण दरवाज्यांना असणारे कडी- कोंडे (door handles) यांची स्वच्छता करणं मात्र राहून जातं. मग हळूहळू वारंवार हात लागून किंवा त्या जागेवर धूळ बसून दरवाज्यांच्या हॅण्डल्स, कड्या घाण, कळकट होऊ लागतात. त्याच्यावर डाग ( How to get rid from the stains on door handles?) पडतात. हळूहळू किटन चढू लागतं. मग ते स्वच्छ करणं मोठं कठीण काम होऊन जातं. त्यासाठीच हे काही उपाय. हे उपाय करून दरवाज्यांचे हॅण्डल आणि कडी- कोंडे चटकन स्वच्छ करता येतील. 

 

दरवाज्यांचे कडी- कोंडे स्वच्छ करण्याचे उपाय
१. तांबे- पितळाचे हॅण्डल असल्यास...

असे हॅण्डल्स चटकन काळे पडतात. दिसायला खूप आकर्षक असले तरी ते मेंटेन करणं खूप कठीण असतं. असे कडी- कोंडे स्वच्छ करायचे असल्यास १ चमचा मैदा, १ चमचा तुरटी आणि १ चमचा मीठ घ्या. हे मिश्रण एकत्र करून ते दरवाज्यांच्या कडी- कोंड्यावर चोळून लावा. यानंतर ४ ते ५ मिनिटे ते तसंच राहू द्या. त्यानंतर गरम पाणी लावून कपड्याने पुसून स्वच्छ करा. 

 

२. क्रोमियम हॅण्डल्स
स्टीलप्रमाणे दिसणारे हे हॅण्डल्स अगदी चकाचक असतात. पण वारंवार हात लागून ते खराब होतात. त्यांची चमक हळूहळू कमी होत जाते. असे हॅण्डल्स स्वच्छ करण्यासाठी १ ग्लास पाणी घ्या. त्यात अर्धा टेबलस्पून डिश वॉश लिक्विड टाका. हे मिश्रण हॅण्डलवर शिंपडा. एखादा मिनिट तसंच ठेवून ते स्वच्छ कपड्याने घासून पुसून घ्या.  


 

Web Title: How to clean door handles? How to get rid from the stains on door handles?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.