Join us

लादी पुसण्याचा मॉप काळाकुट्ट-मळकट झालाय? साफ करण्याची सोपी ट्रिक- घाणेरड्या वासापासूनही होईल सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2025 18:05 IST

mop hygiene tips: remove stains and smell from mop: घाणेरडा मॉप काही मिनिटांत स्वच्छ करुन आपण पुन्हा त्याला नव्यासारखा चमकवू शकतो.

घराला स्वच्छ करण्यासाठी आपण रोज साफसफाई करतो. घाईच्या दिवशी आपल्या हवी तशी घराची साफसफाई होत नाही.पण सुट्टीच्या दिवशी मात्र घर अगदी चकाचक दिसेल इतके साफ केले जाते. (how to clean dirty mop) आपण घरातील कानाकोपरा स्वच्छ करतो परंतु, फरशी चमकवण्यासाठी जवळपास मॉप किंवा पासपुसणीचा वापर करतो. अगदी नवीन आणलेला मॉप २ ते ३ दिवसात काळाकुट्ट पडतो. (mop cleaning home hacks) मॉपने घर साफ करताना आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो. ज्यामुळे घाण आणि दुर्गंधी साचू लागते. (floor mop cleaning tips) त्यामुळे फरशी व्यवस्थित स्वच्छ होत नाही आणि घरात घाण वास पसरतो.(easy way to clean dirty mop) घाणेरडा मॉप काही मिनिटांत स्वच्छ करुन आपण पुन्हा त्याला नव्यासारखा चमकवू शकतो.

कार्डियाक ॲटॅक येण्यापूर्वी शरीरात दिसतात ५ लक्षणं, डॉक्टर सांगतात अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून...

मॉप क्लिन कसा कराल?

मॉप क्लिन करण्यासाठी आपल्याला पॉलिथिन, एक वाटी मीठ, २ चमचे बेकिंग सोडा, बाथरुम क्लिनर, पाणी आणि डेटॉलची लागेल. मॉप क्लिन करताना सगळ्यात आधी ते पॉलिथिन बॅगमध्ये घाला. यात मीठ आणि बेकिंग सोडा घाला. त्यात बाथरुम क्लिनर, डेटॉल आणि पाणी मिसळा. घाणेरडा मॉप पॉलिथिन बॅगमध्ये ठेवा. त्यानंतर बॅगमध्येच मॉपला घासा. 

मॉपमध्ये घाण आणि वास येण्याची अनेक कारणे असू शकतात. जमिनीवर साचलेली धूळ, माती आणि घाण मॉपमध्ये साचते. मॉप ओलाच असल्यामुळे त्यात बॅक्टेरिया आणि बुरशी लागते, ज्यामुळे दुर्गंधी पसरते. त्यासाठी आपल्याला मॉप योग्य रित्या सुकवायला हवा. वास आणि जंतू दोघांचा घाण वास येणार नाही.

 

 

या गोष्टी लक्षात ठेवा

1. मॉप वापरल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने चांगला धुवावा आणि पिळून घ्यावा.

2. मॉप नेहमी हवेत आणि सूर्यप्रकाशात वाळवा. ज्यामुळे त्याला चिकटलेले जंतू नष्ट होतील आणि दुर्गंधी येणार नाही.

3. घाण आणि बुरशीमुळे दुर्गंधी येणार नाही. म्हणून दर आठवड्याला मॉप स्वच्छ करा.

4. जर मॉप खूप जुना आणि खराब झाला असेल तर तो बदला.

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स