हल्ली अनेक घरांमध्ये पांढरी फरशी पाहायला मिळते. परंतु, तिची स्वच्छता नेहमी राखण आपल्याला शक्य होत नाही.(how to mop floor without streaks) घराची साफ सफाई करताना आपण फरशी देखील रोज साफ करतो. यावर तेलाचे, चहाचे किंवा इतर डाग पडले तर ती घाण दिसू लागते. (how to clean dirty floor)नियमितपणे साफ करुन देखील फरशीवर पिवळे-काळे डाग राहतात. लहान मुलांना या फरशीवर खेळण्याची आणि बसून खाण्याची सवय असते.(mopping mistakes to avoid) ज्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची जास्त भीती असते. आपण फरशी साफ करण्यासाठी अनेक घरगुती उपाय करतो परंतु, यात अशा काही चुका देखील करतो.(home floor cleaning tips) ज्यामुळे ती साफ होण्याऐवजी त्यावर काळ्या डागांचे थर जमा होतात. फरशी साफ करताना कोणत्या चुका टाळायला हव्या जाणून घेऊया.
फ्रीजमधून कुबट वास, साफ करताना वेळ जातो? ५ सोप्या टिप्स- झटपट साफ होईल, चमकेल नव्यासारखे...
1. चुकीचा क्लिनर वापरणे
फरशीवरील डाग साफ करण्यासाठी आपण योग्य उत्पादने निवडणे देखील तितकेच गरजेचे आहे. विचार न करता फ्लोअर क्लिनर खरेदी केला तर फरशी खराब होऊ शकते. क्लिनर्समध्ये अनेक रसायने असतात, ज्यामुळे फरशी खराब होऊ शकते.
2. फरशीवरील डाग काढण्यासाठी
लादीवरील डाग काढण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो. परंतु, जास्त क्लिनर वापरल्याने फरशी खराब होते. केमिकल असणारे उत्पादने फरशीसाठी हानिकारक असतात.
तेलाची बाटली चिकट-तेलकट झाली? सोपे उपाय- बाटली होईल एकदम चकाचक
3. चुकीचा मॉप वापरणे
फरशी साफ करण्यासाठी आपण स्क्रबर, मॉप्स, झाडू, ब्रश आणि कापड यांसारख्या गोष्टी वापरतो. अनेकदा आपण डिझाईन असलेले मॉप वापरतो. ज्यामुळे घाण निघत नाही. लादीवर त्याच्या खुणा दिसतात पण फरशीवरचे डाग निघत नाही.
4. वारंवार फरशी पुसणे
फरशीवर चुकून काही सांडले तर अनेकजण ती वारंवार पुसतात. परंतु, अशावेळी कोरड्या कापडाने फरशी साफ केल्यास चमकेल. फरशी पुसण्याचे कापड आणि पाणी दोन्ही नेहमी स्वच्छ असायला हवे.