गुढीपाडवा आता अवघ्या एका दिवसांवर आला आहे. आतापर्यंत सगळ्यांच्या घरात गुढी उभारण्यासाठीची सगळी तयारी सुरु असेलच, तर काहींची सगळी तयारी झाली असेल. गुढी उभारायची म्हटलं की, फुलांच्या माळांपासून ते रांगोळीपर्यंत अशी सगळी जय्यत तयारी करावी लागते. गुढी उभारण्यासाठी तांब्याचा किंवा चांदीचा (Easy And Simple Method Of Cleaning Copper Utensils) कलश वापरला जातो. हा कलश बांबूच्या काठीवर उलटा ठेवून गुढी (How to Clean Copper Utensils) उभारली जाते. आपल्या प्रत्येकाकडे असा तांब्याचा कलश असतो, हा कलश अनेक शुभ कार्यांमध्ये वापरला जातो. हा तांब्याचा कलश एरवी वापरत नसल्याने आपण तो कपाटात ठेवून देतो. फक्त सणवार, शुभकार्य किंवा खास प्रसंग असला तरच हा कलश वापरला जातो(How To Clean Copper Utensils At Home).
हा कलश रोजच्या वापरात नसल्याने त्यावर काळा थर जमा होतो. याचबरोबर, तांब्याची किंवा चांदीची भांडी फारशी न वापरता अशीच ठेवून दिली की तांब्याचे वातावरणातील हवेशी संपर्क येऊन ऑक्सिडायझेशन होते आणि यामुळे भांडी काळी पडतात. मग आयत्यावेळी ही भांडी काढली तर ती स्वच्छ करण्यासाठी तासंतास घासावी लागतात. यासाठीच, आपण एक खास घरगुती उपाय नक्की करू शकतो. हा उपाय करण्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून, ही तांब्याची भांडी नव्यासारखी लख्ख करू शकतो. गुढी पाडव्यासाठी जर तुम्ही देखील अजूनपर्यंत तांब्याचा कलश स्वच्छ केला नसेल तर, हा उपाय करून पहा. यामुळे तुमचा तांब्याचा कलश अगदी २ मिनिटांत स्वच्छ होईल....
तांब्याचा गडू/कलश स्वच्छ करण्यासाठी...
१. काळीकुट्ट झालेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला फक्त १ टोमॅटो, १ टेबलस्पून मीठ, १ टेबलस्पून व्हिनेगर आणि १ टेबलस्पून लिक्विड सोप इतकं साहित्य लागणार आहे.सगळ्यात आधी एक टोमॅटो घेऊन तो किसणीच्या मदतीने किसून घ्यावा, किंवा आपण टोमॅटोचा रस देखील वापरू शकता. टोमॅटोच्या रसात प्रत्येकी १ टेबलस्पून मीठ, व्हिनेगर आणि लिक्विड सोप घालावे. आता चमच्याने हे सगळे जिन्नस एकत्रित मिसळून घ्यावे. आता एका मोठ्या परातीत तांब्याचे भांडे ठेवून त्यावर फक्त चमच्याने हे तयार द्रावण ओता आणि जादू पहा. त्यानंतर पाण्याने फक्त स्वच्छ धुवून घ्यावे. फक्त या एका द्रावणाचा वापर करून आपण न घासताही तांब्याची भांडी नव्यासारखी स्वच्छ करू शकतो. या उपायाचा वापर करून काळीकुट्ट झालेली तांब्याची भांडी फारशी मेहनत न घेता स्वच्छ चकचकीत होतील.
डाएट करतानाही बिंधास्त खा पुऱ्या, तमन्न भाटियाचे फिटनेस कोच सांगतात-पुरी खाण्याचं तंत्र...
Gudhi Padwa 2026 : गुढीपाडव्याला करा रेशमासारखं मऊ श्रीखंड! परफेक्ट श्रीखंड करण्यासाठी ९ टिप्स...
२. जर तुमच्याकडे दिवाळीला लावतो त्या मातीच्या पणतीमधील एखादी पणती उरली असेल तर ही पणती किसणीवर किसून त्याची पावडर करा. आपण ही पणती खलबत्त्यात घालून कुटून देखील त्याची पावडर करू शकतो. या पावडर मध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून मीठ आणि व्हिनेगर घालून पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यावी. मग ही तयार पेस्ट तांब्याच्या गडूला लावून ५ ते १० मिनिटे असेच ठेवून द्यावे. मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावं. तांब्याचा कलश नव्यासारखा चमकू लागेल.
२. चांदीचा गडू/कलश स्वच्छ करण्यासाठी...
१. चांदीची भांडी घासताना ती ओरखडू नयेत याची काळजी घ्यावी लागते. चांदीच्या गडूला साधी पांढरी टूथपेस्ट लावा आणि जुन्या मऊ टूथब्रशने हळुवार घासा. ५ मिनिटांनंतर पाण्याने धुवा, चांदी एकदम लख्ख होईल.
२. यासोबतच, दुसरा उपाय म्हणजे एका पात्रात गरम पाणी घ्या, त्यात एक तुकडा ॲल्युमिनियम फॉईल आणि २ चमचे बेकिंग सोडा टाका. त्यात चांदीचा गडू ५ ते १० मिनिटे बुडवून ठेवा. रासायनिक प्रक्रियेमुळे काळेपणा आपोआप निघून जाईल. जर चांदी जास्त काळी नसेल, तर साध्या विभुतीने किंवा बारीक रांगोळीने घासल्यास ती छान चमकते.
