Join us  

फक्त सेफ्टी पिन - सुई वापरून कंगवा स्वच्छ होत नाही, बघा कंगवा कसा आणि कधी स्वच्छ करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 5:57 PM

Cleaning Tips For Hair Brush Or Comb: तुमचा रोजचा वापरायचा कंगवा अस्वच्छ असेल तरीही त्याच्यामुळे डोक्यातला कोंडा, केसांमधला दुर्गंध वाढू शकतो. (How often we should clean hair brush)

ठळक मुद्दे. काही महिने नियमितपणे हा उपाय केला तर केसांतला कोंडा तर कमी होईलच, पण केसांमधून दुर्गंध येणेही कमी होईल.

कंगवा ही आपली अगदी रोजची वापरायची वस्तू. पण तरीही आपण त्याच्या स्वच्छतेकडे मात्र सर्रास दुर्लक्ष करतो. केसांच्या स्वच्छतेसाठी केस अगदी आठवड्यातून दोन वेळा व्यवस्थित शाम्पू करून धुतो. पण त्याच केसांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या कंगव्याची स्वच्छता मात्र महिनोंमहिने करायला विसरतो (How to clean comb?). जर आपला कंगवा खूप जास्त अस्वच्छ असेल तर त्यामुळे डोक्यात कायम कोंडा होणे, डोक्याच्या त्वचेला खाज येणे, केसांमधून कायम दुर्गंध येणे, असा त्रास होऊ शकतो (Proper method of cleaning comb). म्हणूनच डोक्याच्या त्वचेचा हा संसर्ग टाळायचा असेल आणि केसांचे आरोग्य सुधारायचे असेल तर कंगव्याची स्वच्छता नियमितपणे होणे अतिशय महत्त्वाची आहे. (How often we should clean hair brush)

 

कंगवा कसा स्वच्छ करावा?

कंगवा स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपकरणे मिळतात. किंवा सेफ्टीपिन, सुई, टुथपिक यांचा वापर करूनही अनेक जण कंगव्याची स्वच्छता करतात. पण अशी स्वच्छता करणं पुरेसं नसतं.

हायपरॲक्टिव्ह मुलांना कसं सांभाळायचं? बघा ५ खास टिप्स

यामुळे कंगव्याच्या दातांमधे अडकलेली घाण निघून जात असली तरी घाणीचे काही कण कंगव्याच्या दातांना चिटकून बसलेले असतात. म्हणून अशी सगळीच घाण निघून जाण्यासाठी कंगवा योग्य पद्धतीने स्वच्छ होणे गरजेचे आहे.

 

कंगवा स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी तर त्याच्यातली घाण काढून घ्या. यानंतर एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्या. त्या पाण्यात थोडा शाम्पू टाका. या पाण्यात आता अर्धा तास कंगवा भिजत ठेवा.

फक्त ताप आल्यावरच नाही, तर तब्येतीच्या 'या' ४ तक्रारी असतील तरी आंघोळ करणं टाळा

अर्ध्या तासाने घरातला जुना टुथब्रश वापरून कंगवा घासून घ्या. यानंतर हा कंगवा उन्हात वाळत ठेवा आणि पुर्णपणे कोरडा झाल्यानंतरच वापरायला काढा.

अशा पद्धतीने प्रत्येक महिन्यात एकदा कंगवा स्वच्छ करायला पाहिजे. काही महिने नियमितपणे हा उपाय केला तर केसांतला कोंडा तर कमी होईलच, पण केसांमधून दुर्गंध येणेही कमी होईल. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलकेसांची काळजी