Tap to Read ➤

हायपरॲक्टिव्ह मुलांना कसं सांभाळायचं? बघा ५ खास टिप्स

हल्ली बहुतांश पालकांची हीच समस्या आहे की त्यांची मुलं खूपच हायपरॲक्टिव्ह आहेत. अजिबात एकाजागी शांत बसत नाहीत आणि थकतही नाहीत.
अशा मुलांना सांभाळणं आई- वडिलांना खरोखरच खूप अवघड जातं. म्हणून हायपरॲक्टिव्ह मुलांना सांभाळताना या काही गोष्टींकडे लक्ष द्या.
हायपरॲक्टीव्ह मुलांमध्ये खूप जास्त एनर्जी असते. त्यांच्या एनर्जीला योग्य फ्लो मिळाला नाही, तर मग ते घरातच गोंधळ घालून पालकांच्या नाकीनऊ आणतात.
त्यामुळे या मुलांना खेळ, डान्स, सायकलिंग अशा भरपूर एनर्जी लागणाऱ्या ॲक्टीव्हिटीमध्ये गुंतवून ठेवा.
पॅकफूड, जंकफूड यांच्यामध्ये आर्टिफिशियल शुगर, आर्टिफिशयल ॲडीटिव्ह्ज असतात. हे पदार्थ मुलांना देऊ नका. कारण या पदार्थांमुळे हायपरॲक्टिव्हिटी वाढत जाते.
मुलांना ओमेगा ३ फॅटी ॲसिड असणारे जवस, अक्रोड असे पदार्थ द्या. यामुळे त्यांच्या मेंदूचा चांगला विकास होतो आणि एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते.
नियमितपणे योगा करायला लावल्यानेही मुलांमधील हायपरॲक्टीव्हिटी कमी होण्यास मदत होते.
हायपरॲक्टिव्ह मुलांचं खेळ, व्यायाम, क्लास असं रुटीन ठरवून टाका, यामुळे त्यांची एनर्जी योग्य ठिकाणी वापरली जाईल.
क्लिक करा