Join us

फरशांच्या गॅपमधला काळेपणा खूप वाढला? १ उपाय- जास्त न घासताही ५ मिनिटांत डाग गायब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2025 15:31 IST

How To Clean Black Lines Or Stains Between Two Tiles: फरशांच्या गॅपमधला काळेपणा खूप वाढला असेल तर तो कमी करण्यासाठी हा उपाय करून पाहा..(how to remove odour from toilet and bathroom?)

ठळक मुद्देखूप जास्त जोर लावून न घासताही कमीतकमी मेहनतीत टाईल्स चकाचक करण्याचा हा उपाय एकदा करून बघाच.

टॉयलेट- बाथरुम स्वच्छ, चकाचक दिसावे म्हणून आपण त्याठिकाणी पांढरट किंवा थोड्या फिक्या रंगाच्या फरशा लावतो. शिवाय काही वर्षांपुर्वी ज्या फरशा टॉयलेट- बाथरुममध्ये लावल्या जायच्या त्या आकाराने लहानही असायच्या. त्यामुळेच या फरशांच्या बाबतीत अशी अडचण येते की आकार लहान असल्याने त्या संख्येने जास्त लागतात आणि शिवाय प्रत्येक फरशी जोडताना मध्ये जो गॅप राहातो त्यामध्ये खूप घाण साचून तिथे काळपटपणा येऊ लागतो. त्यामुळे मग बाथरुमच्या फरशा कितीही घासल्या तरी स्वच्छ, चकाचक होत नाहीत. म्हणूनच दोन फरशांच्या गॅपमधला काळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही हे काही उपाय करून पाहू शकता.(How To Clean Black Lines Or Stains Between Two Tiles?)

 

फरशांच्या गॅपमधला काळेपणा कसा कमी करावा?

दोन फरशांमधला काळपटपणा वाढून टाईल्स अस्वच्छ दिसायला लागल्या असतील तर त्या कशा स्वच्छ कराव्या याविषयीचा व्हिडिओ diy2home या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

तरुण त्वचेसाठी चिनी- कोरियन मुलींप्रमाणे 'या' गोष्टी करा, ८ दिवसांतच १० वर्षांनी तरुण दिसू लागाल.. 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला ४ पदार्थ लागणार आहेत. त्यापैकी एक आहे फ्लोअर क्लिनर लिक्विड. एका भांड्यामध्ये १ कप फ्लोअर क्लिनर लिक्विड घ्या. त्यामध्ये १ कप बेकिंग सोडा आणि १ कप डिशवॉश लिक्विड घाला.

 

आता या मिश्रणाला अधिक उत्तम करण्यासाठी त्यामध्ये १ कप व्हाईट व्हिनेगर घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या. आता हे लिक्विड टाईल्सच्या गॅपवर टाका आणि एखाद्या मिनिटासाठी तसेच राहू द्या.

साडीचा काठ ब्लाऊजमध्ये 'या' पद्धतीने वापरा! ब्लाऊज दिसेल हटके, स्टायलिश- पाहा ९ आयडिया

त्यानंतर त्या भागावर अगदी थोडेसे गरम पाणी घाला आणि ब्रशने टाईल्स घासून काढा. अगदी झटपट सगळे डाग निघून जातील आणि दोन फरशांच्या फटीमधला काळेपणा निघून गेल्याने फरशी अगदी चकाचक दिसायला लगेल.

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी