Join us

जुने उपाय फेल! काळाकुट्ट- घाणेरडा गॅस बर्नर होईल मिनिटांत साफ, १ सोपी ट्रिक- खसाखसा घासण्याची गरजही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2025 17:14 IST

clean gas burner easily: home remedies for dirty gas stove: remove grease from gas burner: स्वयंपाकघरात असणाऱ्या काही पदार्थांनी काळाकुट्ट झालेला गॅस बर्नर स्वच्छ करु शकतो. यासाठी काय करायला हवं जाणून घेऊया.

आपल्या स्वयंपाकघरातील आणि रोज वापरली जाणारी वस्तू अर्थात गॅस बर्नर. या बर्नरमुळे आपण अनेक चमचमीत पदार्थ बनवू शकतो.(clean gas burner easily) पण अनेकदा जेवण बनवताना यावर तेल सांडते, मसाले किंवा दूध पडते ज्यामुळे बर्नर खराब होतो. यावर हळूहळू डाग पडतात. हे डाग हळूहळू इतके गडद होतात की कितीही प्रयत्न केले तरी सहज निघत नाही. (home remedies for dirty gas stove)अनेकदा गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी आपण विविध ट्रिक्स वापरतो.(remove grease from gas burner) पण हे गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी महागड्या रसायनांची आवश्यकता नाही.(kitchen cleaning hacks) स्वयंपाकघरात असणाऱ्या काही पदार्थांनी काळाकुट्ट झालेला गॅस बर्नर स्वच्छ करु शकतो. यासाठी काय करायला हवं जाणून घेऊया. (sparkling gas stove tips)

how to get rid of cockroaches: जुन्या ट्रिक सोडा! ४ सोपे उपाय-घरभर फिरणारी झुरळं जातील कायमची पळून- कानाकोपऱ्यातही दिसणार नाहीत

गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी आपल्याला एक मोठे भांडे घ्या. त्यात गॅस स्टोव्हचे दोन्ही बर्नर ठेवा. बर्नर पूर्णपणे थंड करा. आता दोन्ही बर्नर पूर्णपणे पाण्यात बुडतील इतके गरम पाणी त्या भांड्यात घाला. बर्नरवरील हट्टी डाग आणि ग्रीस काढण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. आता त्यात लिंबाचा रस घाला. 

लिंबात सायट्रिक आम्ल नैसर्गिक क्लिनर म्हणून काम करते आणि हट्टी डाग काढून टाकण्यासाठी चांगले आहे. त्यानंतर त्यात बेकिंग पावडर घाला. ज्यामुळे बर्नर चमकण्यास मदत होईल. यात आपण एनो पावडर देखील घालू शकतो. यामुळे बर्नरवरील काळेपणा कमी होईल. जेव्हा गरम पाण्यात याचा फेस तयार झाला की हळूहळू साचलेली घाण कमी होते. 

या द्रावर्णात बर्नरला सुमारे १० ते १५ मिनिटे राहू द्या. यामुळे ग्रीसचे डाग निघून जातील. आता आपल्याला जुना ब्रश किंवा स्क्रबरच्या मदतीने बर्नरला घासावे लागतील. यामुळे काळे डाग निघतील आणि बर्नर नव्यासारखा चमकेल. गॅस बर्नर दीर्घकाळ स्वच्छ आणि चमकदार राहायचे असतील तर आठवड्यातून एकदा हा उपाय करून पहा. दररोज स्वयंपाक केल्यानंतर, घाण साचू नये म्हणून बर्नर हलक्या ओल्या कापडाने पुसून टाका. हे उपाय केल्याने स्वयंपाकघरातील गॅस बर्नर स्वच्छ होतील. 

 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स