Join us

काळीकुट्ट-घाणेरडी पायपुसणी म्हणजे घरात सतत आजारपण! ३ उपाय, कमी मेहनतीत पायपुसणी होतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2025 11:27 IST

Clean dirty doormats: How to clean doormats: Doormat cleaning hacks: पावसाळ्यात डोअरमॅट साफ करता येत नाही, तशाच त्या लवकर सुकत देखील नाही. त्यामुळे आपण त्या साफ करण्याच्या भानगडीत पडत नाही. अशावेळी सोप्या ट्रिक्स वापरा.

घराच्या मुख्य दरवाजाजवळ आपण डोरमॅट ठेवतो. परंतु, हीच डोरमॅट आपल्या आजार वाढवू शकते.(Clean dirty doormats) घरात बाहेरील धुळीचे कण, जंतू आणि घाण येऊ नये यासाठी आपण पायपुसणी ठेवतो.(How to clean doormats) ज्यामुळे घाणीचे पाय घरात येणार नाहीत. पायपुसण्या जड असल्यामुळे त्या सुकायला जास्त वेळ घेतात. त्यामुळे आपण त्यांना वारंवार धुणे टाळतो.(Doormat cleaning hacks) आपले घर किती स्वच्छ आहे हे घरातील पायपुसणी सांगते. त्यासाठी घर स्वच्छ आणि साफ ठेवणे देखील गरजेचे आहे.(Easy doormat cleaning)साध्या पाण्याने डोरमॅट धुतल्यास ते स्वच्छ होत नाही. त्यासाठी आपण महागड्या क्लिनरचा वापर करतो.(Quick and easy doormat cleaning hacks) परंतु, पावसाळ्यात डोअरमॅट साफ करण्यासाठी कंटेट क्रिएटर शशांक आल्शी यांने काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. ज्याच्या मदतीने आपण डोअरमॅट आपण मिनिटात स्वच्छ करु शकतो.(Clean stubborn dirt from doormats) 

बाथरुममध्ये चुकूनही ठेवू नका या ५ गोष्टी, साफ करताना येतात नाकीनऊ- वाढतात आरोग्याच्या तक्रारी

1. धूळ साफ करा 

आपले घर जर खुल्या वातावरणाच्या ठिकाणी असेल तर धुळ साचणे ही गोष्ट सामान्य आहे. स्वच्छतेसाठी आपल्याला सगळ्यात आधी घर साफ करायला हवे. झाडूने आपण डोरमॅट साफ करु शकतो. तसेच भिंतीवर देखील जोरात डोरमॅट झाडू शकता. 

2. क्लिनरचा वापर 

आपल्याकडे कॉयर क्लिनर असेल तर डोअरमट न धुता साफ करता येईल. ज्याप्रमाणे आपण कार्पेट आणि चटई व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करतो. त्याचप्रमाणे आपल्याला डोरमॅट साफ करायचे आहे. यामुळे डोअरमॅटवरील धूळ आणि घाण लवकर साफ होते. 

3. ब्रशचा वापर करा

डोअरमॅट साफ करण्यासाठी     आपण कपडे धुण्याचा ब्रश देखील वापरु शकतो. त्यासाठी आपल्याला डोअरमॅटवर ब्रश घासावा लागेल. हा ब्रश ओला न करता घासा ज्यामुळे डोअरमॅटवरील घाण त्वरित साफ होईल. 

4. हट्टी डाग काढण्यासाठी 

डोअरमॅटवर तेलाचे किंवा काळे डाग पडले असतील तर ते साफ करण्यासाठी एक लिटर पाण्यात एक चमचा डिशवॉश मिसळा. बोटाच्या मदतीने डागावर पाणी आणि डिशवॉशचे मिश्रण लावा. जुन्या टूथब्रशच्या मदतीने हलके घासून स्वच्छ करा. डोअरमॅट लवकर स्वच्छ होईल. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स