असं म्हणतात की तुमच्या घरात जी दिसते ती स्वच्छता अगदी वरवरची आहे की मुळातच तुम्ही घर स्वच्छ ठेवता हे जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी तुमच्या घरातलं टाॅयलेट, बाथरुम तपासा. तुमचं टॉयलेट, बाथरुम किती स्वच्छ आहे, यावरून तुमच्या घरातल्या स्वच्छतेची परीक्षा केली जाते. त्यामुळे ते नेहमीच स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. पण नेमकं होतं असं की आपल्या घरातली ही दोन्ही ठिकाणं नेहमीच ओलसर असतात. त्यात आता घरोघरीच बोअरवेलचे पाणी वापरले जाते. ओलसरपणा आणि बोअरवेलचं क्षारयुक्त पाणी यामुळे टॉयलेट, बाथरुमच्या टाईल्स लवकर खराब होतात आणि त्यांच्यावर पिवळी झाक येते. रोज घासूनही तो पिवळेपणा कमी होत नाही (simple tips to clean yellow stains on bathroom tiles). म्हणूनच आता हा एक सोपा उपाय पाहा (how to clean hard water stains from bathroom tiles?). यामुळे अवघ्या काही मिनिटांतच बाथरुमच्या टाईल्स अगदी स्वच्छ होतील.(how to clean bathroom tiles?)
बाथरुमच्या टाईल्सचा पिवळेपणा कसा कमी करावा?
बाथरुमच्या टाईल्सचा पिवळटपणा कमी करण्यासाठी एका भांड्यात सगळ्यात आधी १ ग्लास गरम पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये एनोचे एक पाकिट टाका. त्यासोबतच तुमच्या घरात असणारा कोणताही शाम्पू एक ते दिड चमचा टाका.
आता १ चमचा डिशवॉश लिक्विड आणि १ चमचा डिटर्जंट पावडर टाका. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. आता हे मिश्रण बाथरुमच्या ओलसर टाईल्सवर टाका.
यानंतर ५ मिनिटे ते मिश्रण तसेच ठेवा आणि त्यानंतर त्यावर आणखी थोडे गरम पाणी घाला आणि बाथरुम घासण्याचा ब्रश हातात घेऊन टाईल्स घासून काढा.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी याच पद्धतीने टाईल्स स्वच्छ करा. अगदी एका प्रयत्नातच बाथरुमच्या टाईल्सचा पक्का असणारा पिवळेपणा कमी होणार नाही. पण काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास बाथरुमच्या टाईल्स नक्कीच स्वच्छ, चकाचक होतील.