Lokmat Sakhi >Social Viral > टेबलफॅनची जाळी न काढता- हातही न लावता ५ मिनिटांत 'असा' करा स्वच्छ, फॅन दिसेल नव्यासारखा...

टेबलफॅनची जाळी न काढता- हातही न लावता ५ मिनिटांत 'असा' करा स्वच्छ, फॅन दिसेल नव्यासारखा...

How to Clean a Fan Without Disassembling It : Tips & Tricks How To Clean a Fan Without Taking It Apart : How to Clean a Table Fan the Right Way : How to Clean a Table Fan : How to clean a Table Fan without opening it : अगदी ५ मिनिटांत टेबलफॅन स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक कोणती ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2025 11:34 IST2025-01-09T11:14:56+5:302025-01-09T11:34:29+5:30

How to Clean a Fan Without Disassembling It : Tips & Tricks How To Clean a Fan Without Taking It Apart : How to Clean a Table Fan the Right Way : How to Clean a Table Fan : How to clean a Table Fan without opening it : अगदी ५ मिनिटांत टेबलफॅन स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक कोणती ते पाहा...

How to Clean a Fan Without Disassembling It How to clean a Table Fan without opening it How to Clean a Table Fan the Right Way | टेबलफॅनची जाळी न काढता- हातही न लावता ५ मिनिटांत 'असा' करा स्वच्छ, फॅन दिसेल नव्यासारखा...

टेबलफॅनची जाळी न काढता- हातही न लावता ५ मिनिटांत 'असा' करा स्वच्छ, फॅन दिसेल नव्यासारखा...

आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या घरी एखादा तरी टेबल फॅन हा कायम असतोच. हा फॅन आपण उचलून कुठेही नेऊन ठेवू शकतो यामुळे घरातील स्टडी टेबलवर किंवा जिथे गरज लागेल तिथे आपण हा फॅन (How to Clean a Fan Without Disassembling It) ठेवून देतो. बरेचदा हा फॅन सतत वापरून (How to Clean a Table Fan the Right Way) यावर धूळ साचते. यामुळे हा टेबल फॅन (How to Clean a Table Fan) वेळीच स्वच्छ करणे गरजेचे असते. परंतु हा जाळी असलेला टेबल फॅन स्वच्छ करणे मोठे कठीण आणि वेळखाऊ काम असते. असा जाळी असलेला टेबल फॅन स्वच्छ करायचा म्हणजे सर्वात आधी त्याचे सगळे पार्टस काढून वेगवेगळे भाग करावे लागतात(How to clean a Table Fan without opening it).

मग या फॅनचा प्रत्येक भाग एक एक करून स्वच्छ धुवावा लागतो. त्यानंतर पुन्हा फॅनचे सगळे पार्ट जोडावे लागतात. परंतु अशाप्रकारे या फॅनची स्वच्छता करायला भरपूर वेळ जातो यामुळे आपण सहसा या फॅनच्या स्वच्छतेकडे दुर्लक्षच करतो. परंतु असे न करता आपण या टेबलफॅनची जाळी न काढताच किंवा कोणताही पार्ट वेगळा न करता अगदी झटपट हा टेबलफॅन स्वच्छ करु शकतो. या टेबलफॅनची जाळी न काढता किंवा फारसा हातही न लावता आपण अगदी ५ मिनिटांत टेबलफॅन स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक पाहा. 

साहित्य :- 

१. पाणी - २ कप 
२. बेकींग सोडा - २ टेबलस्पून 
३. लिक्विड डिशवॉश - १ टेबलस्पून 
४. व्हाईट व्हिनेगर - १ टेबलस्पून 
५. स्प्रे बॉटल - १ बॉटल

चपाती लाटताना पीठ ओट्यावर फार सांडते? ही 'फ्लावर डस्टर' आयडिया पाहा, ओट्यावर पसारा होतच नाही...

टेबलफॅन स्वच्छ करण्याचे सोल्युशन कसे तयार करावे ? 

सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये, पाणी घेऊन त्यात  बेकींग सोडा पावडर, लिक्विड डिशवॉश, व्हाईट व्हिनेगर घालूंन घ्यावे. त्यानंतर चमच्याच्या मदतीने हे सगळे घटक हलवून पाण्यांत व्यवस्थित मिसळून घ्यावेत. त्यानंतर हे तयार सोल्युशन एका स्प्रे बाटलीत भरून घ्यावे. 

मटार सोलण्याचं काम होईल झटपट, ३ ट्रिक्स- काही मिनिटांतच मटार होतील सोलून...

हे तयार सोल्युशन वापरून टेबलफॅन कसा स्वच्छ करायचा ते पाहा... 

सगळ्यात आधी या फॅनवरची धूळ एखाद्या जुन्या ब्रशने काढून घ्यावी. त्यानंतर कॉटनच्या कापडाच्या मदतीने हा टेबलफॅन एकदा बाहेरून स्वच्छ पुसून घ्यावा. आता हे तयार केलेले सोल्युशन फॅनच्या जाळीवर तसेच आतील फॅनच्या पातींवर पुढून आणि मागून स्प्रे करून घ्यावे. त्यानंतर १० मिनिटे हे सोल्युशन फॅनवर तसेच राहू द्यावे. १० मिनिटानंतर फॅनचे स्विच ऑन करून फॅन सुरु करावा.

फॅन सुरु केल्याने फॅन फिरू लागेल. फॅन फिरल्याने त्याच्या वाऱ्याने हे स्प्रे केलेले सोल्युशन सगळीकडे पसरेल आणि धूळ बाहेर फेकली जाईल. यामुळे हा टेबलफॅन स्वच्छ करण्यासाठी आता आपल्याला या फॅनची जाळी काढण्याची किंवा फॅनचे पार्टस वेगवेगळे करून ओपन करण्याची गरज भासणार नाही. अशाप्रकारे आपण अगदी ५ मिनिटांतच हा टेबलफॅन झटपट स्वच्छ करु शकतो.

Web Title: How to Clean a Fan Without Disassembling It How to clean a Table Fan without opening it How to Clean a Table Fan the Right Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.