सध्याच्या काळात मोबाईल ही खूपच गरजेचे वस्तू झाली आहे. आपण दिवसभरातील एक मिनिट देखील मोबाईलशिवाय राहू शकत नाही. एवढचं नाही तर काहीजणांना मोबाईलची इतकी सवय (How to clean a dirty white charger cable) झालेली असते की ते मोबाईल (How to clean a dirty phone charger) फोन चार्जिंगला असताना देखील त्याचा वापर करतात. मोबाईल फोन व त्याचा चार्जर, हेडफोन्स, कॉड्स या सगळ्या वस्तू आता आपल्या रोजच्याच वापरातील असल्याने त्या दिवसभरात अनेकवेळा हाताळल्या जातात(How to clean mobile dirty white charger).
मोबाईल सोबत मोबाईलचा चार्जर देखील दिवसभरात तितकाच वापरला जातो. या सततच्या वापराने मोबाईल फोनचा चार्जर देखील कालांतराने मळून खराब होतो. शक्यतो मोबाईल फोनचे चार्जर हे पांढऱ्या आणि काळया रंगाचेच असतात. काळ्या रंगाच्या चार्जरवर डाग पडले किंवा खराब होऊन मळाल तरीही लगेच दिसून येत नाही. परंतु याउलट पांढऱ्या रंगाचा चार्जर हा तुलनेने अधिक लवकर खराब होतो. सतत रोज वापरुन या पांढऱ्याशुभ्र चार्जरचा रंग बदलून काळाकुट्ट होतो अशावेळी नेमकं चार्जर कसा स्वच्छ करायचा असा प्रश्न पडतो. चार्जर ही एक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असल्याने आपण ती पाण्याने देखील स्वच्छ धुवू शकत नाही. यामुळे अशा पांढऱ्याशुभ्र चार्जरवर धूळ, घाण साचत राहून तो मळून काळाकुट्ट होऊ नये यासाठी तो स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स आपण लक्षात ठेवूयात. मोबाईल फोनचा पांढराशुभ्र चार्जर आणि वायर मळून काळीकुट्ट झाली असे तर अशा पद्धतीने करा मिनिटभरात स्वच्छ...
मोबाईल फोनचा पांढराशुभ्र चार्जर आणि वायर काळीकुट्ट झाल्यास...
१. व्हिनेगर आणि पाणी :- पांढऱ्या रंगाचा मोबाइल चार्जर लवकर घाण होतो. अशा परिस्थितीत फोन तसेच पॉवर बँक, इअरफोन आणि मोबाइल चार्जर आणि त्याची केबल वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे. चार्जर साफ करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक उपाय करायचा आहे, त्यासाठी व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा वापरून एक पेस्ट तयार करा. सर्वप्रथम एका कपमध्ये तीन ते चार चमचे व्हिनेगर आणि पाणी घालून द्रावण तयार करा. या द्रावणात कापड भिजवून ते पिळून घ्या. आता तुम्ही या कपड्याने चार्जर आणि वायर्स स्वच्छ करू शकता.
टेबलफॅनची जाळी न काढता- हातही न लावता ५ मिनिटांत 'असा' करा स्वच्छ, फॅन दिसेल नव्यासारखा...
२. शेव्हिंग क्रीम :- काळे किंवा घाणेरडे चार्जर पूर्वीसारखे पांढरेशुभ्र स्वच्छ करण्यासाठी तुम्ही शेव्हिंग क्रीम देखील वापरू शकता. शेव्हिंग क्रीम चार्जिंग केबलवर सुरक्षितपणे लावा. यानंतर चार्जिंग केबल स्वच्छ कापडाने पुसुन घ्या.
३. बेकिंग सोडा :- चार्जर साफ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी एका भांड्यात थोडे पाणी ठेवा. यानंतर ३ ते ४ चमचे बेकिंग सोडा घालून मिक्स करा. एक मिश्रण तयार करा आणि त्यात कपडा भिजवा. यानंतर, चार्जर ओल्या कपड्याने पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर कोरडे कापड घ्या आणि चार्जर स्वच्छ करा.
थंडीत कुडकुडत टू व्हीलर चालवणं अवघड, करा २ गोष्टी-थंडी अजिबात वाजणार नाही...
४. लिंबाचा रस :- सर्वात आधी एका बाऊलमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात १ टेबलस्पून बेकिंग सोडा घालावा. आता लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांची एकत्रित पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट एका स्वच्छ सुती कापडाच्या किंवा स्पंजच्या मदतीने चार्जर आणि त्याच्या वायरवर लावून घ्यावी. त्यानंतर ५ मिनिटे ही पेस्ट चार्जरवर तशीच राहू द्यावी मग कोमट पाण्यांत कापड भिजवून अशा हलक्या ओलसर कापडाने चार्जर पुसून घ्यावा.
पी.व्ही. सिंधूने लग्नात घातलेल्या दागिन्यांची जगभर चर्चा, त्या दागिन्यात पाहा खास काय आहे...